{"title":"अनुवादित कथा-कादंबरी","description":null,"products":[{"product_id":"adrushya-manus","title":"अदृश्य माणूस","description":"\u003cp\u003eती बोलत असतानाच एक अत्यंत अद्भुत गोष्ट घडली. पलंग आणि खुर्चीवरचे कपडे आपोआप गोळा झाले आणि त्या कपड्यांचा गठ्ठा हवेतून उडत जात जिन्यावरून अचानक खाली गेला. जणू कुणीतरी कपड्यांचा ढीग हातात धरून तो खाली फेकला असावा. खुर्चीच्या पाठीला अडकवलेली पाहुण्याची हॅट पुढच्याच क्षणी हवेत गोलगोल फिरायला लागली आणि मि. हॉलच्या दिशेनं अचानक चाल करून आली... खोलीतलं फर्निचर हवेत उडत विजयी नृत्य करत असल्यासारखे आवाज काही क्षण येत राहिले. मग सगळं काही शांत झालं.\u003cbr\u003e    एका इंग्लिश खेडेगावातल्या पथिकाश्रमात ऐन हिवाळ्यात एक विचित्र दिसणारा अनोळखी इसम येतो. पथिकाश्रमाच्या मालकिणीला आणि गावकर्‍यांना हा इसम विक्षिप्त, गूढ  वाटत असतो, पण जेव्हा त्याचं खरं रूप समोर येतं, तेव्हा सगळे जण  हादरून जातात. कारण तो माणूस अदृश्य असतो ! \u003cbr\u003e    प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक एच.जी. वेल्स यांच्या प्रतिभेतून अवरतेली, पिढ्यान् पिढ्या वाचली गेलेली आणि मानवी मनातल्या दुष्ट प्रवृत्तीला अधोरेखित करणारी ही कादंबरी एकाच वेळी खिळवून ठेवते आणि अंतर्मुखही करते.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36435046138015,"sku":"905","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/905f.jpg?v=1601377435"},{"product_id":"nidrit-nikhare","title":"निद्रित निखारे","description":"\u003cp\u003e खूप मोठा होऽऽ असं म्हणत मी त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला. एकदम चहूकडून आवाज उमटले, हराम है.. हराम है, गैर औरत का गैर मर्द को छूना हराम है| मला धक्काच बसला. स्त्री म्हणजे काय हे ही लहानलहान, अबोध-अज्ञ मुलं मला सांगत होती. टीव्ही कॅमेरे चालू होते. माझा कॅमेरा कॅमेरामनकडे देत मी त्याला म्हटलं की, माझा मेहदीबरोबर एक फोटो काढ. माझं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच मेहदीनं कठोर आवाजात सांगितलं, मी स्त्रीबरोबर माझा फोटो काढू शकत नाही, कारण इस्लाममध्ये हे पाप मानलेलं आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हिंदी साहित्यविश्वात आपल्या चतुरस्र संचाराने वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक नासिरा शर्मा आपल्या परखड आणि अंतर्भेदी दृष्टीकोनामुळे प्रस्थापित साहित्यिक वर्तुळाबाहेरच राहिल्या. मात्र तरीही एका व्रतस्थ वृत्तीनी साहित्यनिर्मितीशी निष्ठा राखत आपल्या कलाकृती सादर करत राहिल्या. अशा या बहुआयामी भारतीय व्यक्तिमत्त्वाला अलीकडेच साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e उर्दू, हिंदी, फारसी, पुश्तु आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व असलेल्या, व्यासंगी पत्रकार असणार्‍या या बंडखोर भारतीय साहित्यिकाच्या साहित्याचा परिचय करून देणारा हा संग्रह..... \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36435056492703,"sku":"910","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/910f.jpg?v=1601377503"},{"product_id":"hans-andersonchya-parikatha","title":"हॅन्स अँडरसन च्या परीकथा","description":"\u003cp\u003eहंस बनलेल्या राजपुत्रांनी ते जाळं आपल्या चोचींमध्ये उचलून घेतलं. आपले विशाल पंख पसरून ते झेपावले. आपल्या बहिणीला घेऊन उंच ढगांपार गेले. एलिझाने भोवती पाहिलं. जमिनीपासून खूप खूप उंचावर होती ती! तिने मावळतीला आलेल्या सूर्याकडे श्वास रोखून पाहिलं.. तेवढ्यात ते हंस इतक्या झर्रकन खाली आले की, तिला वाटलं आता आपण पडणार! पण आता थोड्याच अंतरावर मुक्कामाचा तो खडक दिसू लागला होता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eखूप खूप वर्षांपूर्वी हॅन्स ख्रिश्चन अँडरसन नावाच्या परीकथाकाराने मुलांसाठी गोष्टींचं एक अद्भुत जग तयार केलं. या जगामध्ये स्वप्नांच्या दुनियेत रमणारी छोटी जलपरी मरमेड होती, आपल्या काळ्याकरड्या रूपामुळे दु:खी झालेलं बदकाचं छोटं पिलू होतं, हंस बनलेल्या आपल्या भावांना शापातून सोडवणारी शूर राजकन्या होती, कुणालाच न दिसणारं कापड विणणारे अजब विणकर होते, रात्र होताच जागं होणारं खेळण्यांचं जग होतं आणि चक्क शेकोटीच्या प्रेमात पडणारा स्नो मॅनसुद्धा होता! इतकी वर्षं झाली, पण या परीकथांमधली जादू ओसरलेली नाही. हॅन्स अँडरसनचं नवलाइने भरलेलं हे जग आम्ही नव्याने तुमच्या भेटीला घेऊन आलोय. त्याच्या जादूच्या पोतडीची मूठ पुन्हा एकदा उघडली आहे. पाहायचं का हळूच आत डोकावून? करायची का सैर या अद्भुत परीकथांच्या भन्नाट जगाची?\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36435067175071,"sku":"912","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/912f.jpg?v=1601377547"},{"product_id":"sherlock-holmes-chya-chaturya-katha","title":"शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा","description":"\u003cp\u003eमी जमिनीवर ठेवलेला दिवा अजून तिथंच होता. त्याच्या प्रकाशामध्ये मला ते काळं छत हळूहळू गचके खात माझ्या अंगावर येताना दिसत होतं. मला पक्कं माहीत होतं की, मिनिटभरातच ते छत माझ्यावर इतक्या प्रचंड शक्तीने आदळणार आहे की, माझा पूर्ण चेंदामेंदा होणार आहे. मी किंचाळत, ओरडत दार ठोठावायला लागलो. आता छत माझ्यापासून केवळ एक किंवा दोन फूट दूर राहिलं होतं. मी शेवटची नजर वेगाने इकडेतिकडे फिरवत असताना मला दोन फळ्यांध्ये पिवळ्या प्रकाशाची एक बारीक रेघ दिसली. दुसर्याच क्षणी मी त्या फळ्यांवर झडप घालून बाहेर पडलो. माझ्यापाठीमागे दिव्याचा चक्काचूर होतानाचा आणि धातूच्या दोन तुळया एकमेकांवर आपटल्याचा आवाज ऐकून मी किती थोडक्यात बचावलो होतो ते मला समजलं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशेरलॉक होम्सच्या इतर कथांप्रमाणेच या कथाही आपली उत्कंठा शिगेला नेतात. रहस्यातली गुंतागुंत, त्याची वातावरणनिर्मिती आणि त्याची उकल करण्याची कॉनन डॉयल यांची खास शैली यांमुळे या कथा आणखी खुमासदार होतात आणि खिळवून ठेवतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36453547081887,"sku":"923","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/923f.jpg?v=1601463910"},{"product_id":"sherlock-holmes-chya-sahas-katha","title":"शेरलॉक होम्सच्या साहस कथा","description":"\u003cp\u003eती रात्र वादळी होती. बाहेर वारा रोंरावत होता. खिडक्यांवर पावसाचे थेंब थडाथडा आदळत होते. वादळाच्या इतक्या प्रचंड आवाजामध्ये एका घाबरलेल्या स्त्रीची अमानवी किंकाळी अचानक ऐकायला आली. हा माझ्या बहिणीचाच आवाज आहे हे माझ्या लक्षात आलं. मी पलंगावरून ताडकन उठले आणि पडवीमधून पुढे धावत गेले, तर माझ्या बहिणीच्या खोलीचं दार उघडलं आणि सावकाश किलकिलं होत त्याची उघडझाप होत राहिली. मी घाबरून बघत राहिले. आतमधून काय बाहेर येईल याची मला काहीही कल्पना नव्हती. तेवढ्यात माझी बहीण दाराकडे आली. तिचं अख्खं शरीर एखाद्या दारुड्यासारखं झोकांड्या खात होतं. मी तिच्याकडे धावले आणि तिला मिठी मारली, पण त्याच क्षणी ती जमिनीवर कोसळली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशेरलॉक होम्सच्या या साहस कथा अक्षरश: श्वास रोखून धरायला लावतात; वाचकाला गुंग करून सोडतात. तसंच या कथांमधून आपल्याला सर कॉनन डॉयलच्या प्रतिभेची पावती मिळाल्याशिवाय राहत नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36453595742367,"sku":"924","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/924f.jpg?v=1601463979"},{"product_id":"kali-manjar","title":"काळी मांजर - एडगर अॅलन पो च्या निवडक गूढकथा","description":"\u003cp\u003eमाझ्या काठीच्या टकटकीचा आवाज त्या शांत तळघरात विरून जातोय न् जातोय, तोच त्या भिंतीतल्या थडग्यातून उलट आवाज आला! एखादं बाळ रडल्यासारखा तो आवाज पहिल्यांदा घुसमटल्यासारखा आणि तुटक तुटक होता. मग अचानक तो मोठा मोठा होत एक लांबलचक भेसूर किंकाळी ऐकू आली. कोणीतरी ओरडत होतं किंवा रडल्यासारखं किंचाळत होतं. त्या आवाजात भीती होती, पण एक प्रकारचा विजयी आनंदसुद्धा होता. खितपत पडलेल्या दुःखी आत्म्यांचं रडणं आणि त्यांचा छळ करणार्‍या असुरांचा राक्षसी आनंद याचं मिश्रण असलेली अशी भयंकर किंकाळी फक्त नरकातूनच ऐकू येऊ शकते!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e विचक्षण वाचकांमध्ये पो त्याच्या लघुकथांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेल्या रहस्यकथा आणि गूढकथा केवळ रहस्य किंवा गूढ उकलणार्‍या नसतात, तर या कथांमध्ये मानसशास्त्रीय मर्मं दडलेली असतात. माणसाच्या नेणिवेत दडलेल्या अनाकलनीय आणि अतर्क्य गोष्टी पो आपल्या कथांमधून समोर आणतो. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या कथांमधून पो आपल्याला त्याच्या अलौकिक आणि अद्भुत विश्वात घेऊन जातो. या गुंगवून टाकणार्‍या कथांमध्ये केवळ भय आणि रहस्य नाही; त्यांच्यात उपहास आणि विनोदही आहे. तसंच मानवी प्रवृत्तींवर केलेलं भाष्यही आहे. म्हणूनच एवढा मोठा काळ लोटूनसुद्धा आजही या कथा मौलिक ठरतात. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36453600624799,"sku":"925","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/925f.jpg?v=1601463985"},{"product_id":"atlas-shrugged","title":"अॅटलस श्रग्ड","description":"\u003cp\u003e हू इझ जॉन गाल्ट?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e तो म्हणाला होता, की तो जगाचा व्यवहार थांबवेल - आणि त्यानं ते केलंही !  पण जगाचा व्यवहार थांबवणारा हा संहारकर्ता होता की मुक्तिदाता?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e तुमचं आयुष्य तुमचं आहे आणि ते पूर्णार्थाने जगणं हेच पुण्यकर्म आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e प्रश्‍न जगायचं की नाही याबाबतचा नसून विचार करायचा की नाही असा आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e माणसाच्या शारीर अस्तित्वापेक्षा त्याच्या बुद्धीचे अस्तित्व हीच त्याची ओळख असते. - बुद्धीला कमी लेखणार्‍या, बुद्धीचा अधिक्षेप करणार्‍या, अन्याय करणार्‍या जगाविरुद्ध उसळून उठून स्फुरलेली ही कादंबरी आयन रँडने विविध क्षेत्रांवर संशोधन करून आपल्या तत्त्वज्ञानाची धार अधिकाधिक तीव्र करीत लिहिली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e स्वत:च्या बुद्धीवर, सामर्थ्यावर जग पेलायचा आत्मविश्‍वास बाळगणार्‍या माणसांची ही कथा एका वेगळ्याच तर्कविश्वात घेऊन जाते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36632287543455,"sku":"545","price":795.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/545f.jpg?v=1602569038"},{"product_id":"the-hobbit","title":"द हॉबिट","description":"\u003cp\u003e‘द हॉबिट’ ही आधुनिक साहित्यातील अभिजात कादंबरी आणि ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ कादंबरीचा पूर्वरंग.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e बिल्बोनं दारासारख्या खिंडारातून पुन्हा एकदा डोकावून पाहिलं तेव्हा, स्मॉग नक्कीच गाढ झोपल्यासारखा दिसत होता. तो पुढे जमिनीवर पाऊल टाकणार तोच, स्मॉगच्या डाव्या डोळ्याच्या लोंबणार्‍या पापणीखालून बाहेर पडणारा बारीक आणि तीक्ष्ण, तांबडा किरण त्याला दिसला. तर हा झोपण्याचं नुसतं ढोंग करतोय ! त्याचं लक्ष भुयाराच्या खिंडाराकडे होतं...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e बॅग एन्ड येथील त्याच्या हॉबिट-बिळातील सुखासीन आणि फारशा महत्त्वाकांक्षा नसलेल्या आयुष्यातून विझार्ड गँडाल्फ आणि ड्वार्फ्सच्या गँगने हुसकावून लावल्यावर, बिल्बो बॅगीन्स एका प्रचंड मोठ्या आणि अतिशय धोकादायक अशा स्मॉग द मॅग्निफिसन्ट, ड्रॅगनच्या खजिन्यावर हल्ला करायच्या योजनेत सामील होतो. या मोहिमेत सहभागी होण्यास बिल्बो जरी आधी अतिशय नाखूष असला तरी नंतर स्वत:च्याच युक्तिबाजपणाने आणि चोरटेपणाच्या कौशल्याने तो स्वत:च  आश्चर्यचकित  होतो !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ही कादंबरी जे.आर.आर. टॉल्कीन यांनी स्वत:च्या  मुलांसाठी लिहिली होती. १९३७ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीच्या प्रथम प्रकाशनाला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९९७ साली ऍलन ली यांनी काढलेल्या रेखाटनांनी चित्ररूप केलेली ही आवृत्ती प्रकाशित झाली. ही कादंबरी ‘या पिढीतील अत्यंत  प्रभावशाली  पुस्तकांमध्ये  गणली जाते.’\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e द  टाइम्स\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36633975357599,"sku":"576","price":396.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/576f.jpg?v=1602580339"},{"product_id":"robin-hood-ani-robinson-crusoe","title":"दोन जगप्रसिध्द साहसकथा : रॉबिन हूड आणि रॉबिन्सन क्रुसो","description":"\u003cp\u003eगेल्या अनेक पिढ्यांपासून \u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eआपले मनोरंजन करणारे \u003c\/span\u003eरॉबिन हूड आणि रॉबिन्सन क्रूसो हे आपले साहसी मित्र पुन्हा एकदा नव्या रूपात आपल्या भेटीला आले आहेत ..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi translation of two classic childrens stories Robin Hood and Robinson Crusoe. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36634368082079,"sku":"601","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/601f.jpg?v=1602582487"},{"product_id":"the-hound-of-baskervilles","title":"शेरलॉक होम्स : द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स","description":"\u003cp\u003eशेरलॉक होम्स च्या मोजक्या चारच कादंबर्‍यांपैकी ही महत्त्वाची कादंबरी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हिच्यावर अनेक सिनेमे, टी.व्ही. सिरियल्स निघाल्या; जगभरातल्या अनेक भाषांतून भाषांतरे झाली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आता मराठीतून वाचकांच्या भेटीला येत आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सर चार्ल्स यांच्या मृत्यूचे रहस्य,\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हेन्री बास्करव्हिलच्या खुनाचा कट... \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e घराण्याला असलेला विचित्र मृत्यूचा शाप...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e इंग्लंडच्या डेव्हेनशायरच्या एकाकी उजाड पार्श्वभूमीवर घडणारं थरारनाट्य !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36634368934047,"sku":"607","price":156.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/607f.jpg?v=1602582494"},{"product_id":"coraline","title":"कोरलाइन","description":"\u003cp\u003eकोरलाइन जेव्हा तो दरवाजा ओलांडून जाते, तेव्हा पलीकडे अगदी तिच्या घरासारखंच हुबेहूब (त्याहून जरा मजेदारच) घर तिला सापडतं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पण तिकडे तिचे दुसरे आईबाबा असतात, ज्यांना त्यांची छोटी मुलगी म्हणून तिला कायमचंच आपल्याकडे ठेवून घ्यायचं होतं आणि तिथून कधीच जाऊन द्यायचं  नव्हतं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e स्वत:ची सुटका करून घेऊन परत आपल्या नेहमीच्या घरी जाण्यासाठी आता कोरलाइनला आपली सगळी बुद्धी आणि धैर्य पणाला लावायचं आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36649312026783,"sku":"612","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/612f.jpg?v=1602652576"},{"product_id":"1984","title":"1984","description":"\u003cp\u003eकालातीत राजकीय भाष्य करणारी कलाकृती !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसत्तेचा विचार उघड करणारं अद्भुत वास्तव-कथन म्हणजे १९८४ ! माणसाच्या नैसर्गिक विपर्यासालाच अंतिम, सत्य व समर्थनीय ठरवणारी सत्ता, त्यातून घडत जाणारी बिनचेहर्‍याची माणसं आणि यात नैसर्गिक संवेदनशीलतेला पडत जाणारा भकासपणाचा विळखा ही कादंबरी कथानकाबरोबर अधिकाधिक घट्ट करत जाते. सत्तेच्या आकांक्षेनुरूप घडत व बदलत जाणारी समाजाच्या मनाची रचना व त्यासाठी सत्तेने राबवलेल्या मूलगामी पद्धती यांचं अफलातून भविष्यकथन जॉर्ज करत जातो. हे कथन पुढे सरकताना कल्पनेपलीकडचं वाटावं इतकं अस्सल उतरतं. म्हणूनच १९४८ साली लिहिलेली ही कादंबरी आजच्या घडीलाही तिचे कुठलेही संदर्भ हरवत नाही आणि कालातीत होते!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘समाजवादी लोकशाहीची स्थापना’ या भूमिकेवर निष्ठा असणार्‍या जॉर्ज ऑरवेलचं एकूण लेखन म्हणजे ध्येयवादी स्वप्नांना पोखरत जाण्यार्‍या सत्तेचा आलेख आहे. केवळ ‘टेबली लेखक’ म्हणून न मिरवता त्याच्या लेखनातून कृतिशील आणि निर्भीड कार्यकर्ता आपल्यासमोर येत जातो. त्यामुळे उद्ध्वस्त होतानाही वास्तवाशी सामना करण्याची त्याची अभूतपूर्व ताकद वाचकाला घेरून टाकते!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36649314287775,"sku":"614","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/614f.jpg?v=1602652588"},{"product_id":"capsule","title":"कॅप्सूल","description":"\u003cp\u003eडॉक्टरी व्यवसायात आडमार्गाने चालणारे धंदे अनेकदा भीषण वळणं घेऊन एखाद्याच्या जीवालाही क्षुल्लक ठरवतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  खोटे रिपोर्ट्स, फार्मा कंपन्यांच्या शानशौकीला बळी पडणारे डॉक्टर्स आणि अनैतिकतेच्या भोळसट चेहर्‍याला फसणारे काही प्रामाणिक पेशेवर आणि \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आपण सामान्य...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आजची सत्य परिस्थिती मांडणारे एक अनोखे थरारनाट्य...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36649323069599,"sku":"624","price":196.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/624f.jpg?v=1602652617"},{"product_id":"the-fountainhead","title":"द फाउंटनहेड","description":"\u003cp\u003eआयन रँडच्या अस्सल साहित्यिक दृष्टिकोनातून आणि परंपरेला छेद देणार्‍या त्यांच्या व्यक्तिवादी तत्त्वज्ञानातून साकारलेली ‘द फाउंटनहेड’ ही कादंबरी १९४३ साली प्रकाशित झाली तेव्हाच सार्‍या जगभरात तिची भरपूर प्रशंसा झाली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या अजरामर कलाकृतीची कथा आहे- एका तत्त्वनिष्ठ तरुण आर्किटेक्टची. समाजात रूढ असलेल्या प्रमाणांविरुद्धच्या त्याच्या कठोरसंघर्षाची, आणि त्याच्याच प्रेमात असून त्याला रोखण्यासाठी आणि वाचवण्यासाठीही झगडणार्‍या एका सुंदर स्त्रीवरच्या त्याच्या उत्फुल्ल प्रेमाची.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आयन रँड \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e (जन्म १९०५, मृत्यू १९८२)\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e १९३६ साली ‘वी द लिव्हिंग’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. १९३८ मध्ये ’ऍन्थम’ प्रकाशित झाली. परंतु, ’द  फाउंटनहेड’ (१९४३) आणि ‘ऍटलस श्रग्ड’ (१९५७) या तिच्या दोन कादंबर्‍या प्रकाशित झाल्या तेव्हा वाचकांनी त्या अक्षरशः डोक्यावर घेतल्या. ‘ऑब्जेक्टिव्हिझम’ या तिच्या विलक्षण तत्त्वज्ञानाची जगभरातून दाखल घेण्यात आली. इंग्रजी वाचकवर्गात या कादंबर्‍या अजूनही प्रचंड खपाच्या यादीत आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ‘ऍटलस श्रग्ड’ या कादंबरीचा मुग्धा कर्णिक यांनी केलेला मराठी अनुवाद २०११ साली डायमंड पब्लिकेशन्सने प्रकाशित केला. त्याला मराठी वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि आता ‘द फाउंटनहेड’ चा अनुवादही त्यांच्याच भाषेत वाचकांच्या भेटीस येत आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36663876386975,"sku":"643","price":476.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/643f.jpg?v=1602741281"},{"product_id":"the-road","title":"द रोड","description":"\u003cp\u003eबेचिराख झालेल्या अमेरिकेतून एकटेच वाट काढत दक्षिणेकडे मार्गक्रमण करणारे वडील आणि त्यांचा लहान मुलगा. वार्‍यावर उडणार्‍या राखेशिवाय त्या उजाड प्रदेशात कसलीही हालचाल नाही. रस्त्यावर पाळत ठेवून असलेल्या लोकांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांच्याजवळ एक पिस्तूल, अंगावरचे कपडे, इकडून-तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक कार्ट; आणि एकमेकांशिवाय काहीही नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e असीम कौर्य, दुर्दैव आणि बेचिराख सृष्टी... पूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही बाळगली जाणारी उद्याची आशा, चांगुलपणा; आणि त्यातच निर्माण होणार्‍या माणुसकी आणि ईश्वरी श्रद्धेविषयीच्या प्रश्‍नांची तात्त्विक मीमांसा करणारी वैचारिक कादंबरी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36663877337247,"sku":"644","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/644f.jpg?v=1602741287"},{"product_id":"tinker-tailor-soldier-spy","title":"टिंकर टेलर सोल्जर स्पाय","description":"\u003cp\u003eटिंकर टेलर सोल्जर स्पाय म्हणजे क्षणोक्षणी कुतूहल वाढवत नेणारी उत्कृष्ट कादंबरी! स्मायली आणि त्याचा शीतयुद्धातला प्रतिस्पर्धी कार्ला यांच्यातला हा सामना चढत जातो. वास्तव, गुंतागुंत आणि रहस्यमयता यांतली उत्कंठा ही कादंबरी शेवटपर्यंत कायम राखते. कुठेही भडक न होता तर्कसंगत आकार घेत जाते. म्हणूनच एकूण रहस्यमय साहित्यात कादंबरीचा हा पट वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सर्कसचा आधीच एक दारुण पराभव झाला आहे. याचा परिणाम म्हणजे एका माणसाच्या पाठीत झाडलेल्या दोन गाळ्या! पण सर्कसच्या आतच याहून मोठा धोका अजूनही दबा धरून आहे : ३० वर्षं सर्कसमध्ये खोलवर रुतलेला मोल. या खोलवर रुतलेल्या मोलचा नायनाट कसा करायचा? हा तिढा सोडवण्यासाठी सुविख्यात जॉर्ज स्मायलीला पाचारण केलं जातं. पण घरभेदी मोलचा शोध म्हणजे गुप्तहेरांवर गुप्तहेरी!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e लेखक जॉन ले कारे हे त्यांच्या पिढीतले प्रथितयश आणि सातत्याने कसदार लेखन करणारे लेखक आहेत. ५० आणि ६०च्या दशकात त्यांनी ब्रिटिश गुप्तहेर संघटनेसाठी कामही केलं होतं. या अनुभवातूनच वास्तव गुप्तहेर जगतावर आधारित उत्तमोत्तम कादंबर्‍या त्यांनी साकारल्या. ‘टिंकर टेलर...’ या कादंबरीसोबतच त्यांच्या इतर अनेक कादंबर्‍यांवर दर्जेदार आणि अनेक पुरस्कार लाभलेल्या चित्रपटांचीही निर्मिती झाली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36663877402783,"sku":"645","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/645f.jpg?v=1602741292"},{"product_id":"sherlock-holmes-a-study-in-scarlet","title":"शेरलॉक होम्स : अ स्टडी इन स्कार्लेट","description":"\u003cp\u003eसर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या शेरलॉक होम्सच्या मोजक्या चारच कादंबऱ्यांपैकी ही सगळ्यात पहिली कादंबरी आणि त्यामुळे अर्थातच वाचकाला होणारी होम्सची ही पहिली-वहिली ओळख...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  ... मि. ड्रेबर आिण मि. स्टँगरसन यांचा रहस्यमय खून आणि त्यांच्या खुनामागे लपलेलं पूर्ववैमनस्याचं कारण...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमींवर घडणाऱ्या कथांमधला होम्सला सापडलेला एक  रंग-\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअ स्टडी इन स्कार्लेट\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36667171340447,"sku":"658","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/658f.jpg?v=1602760122"},{"product_id":"sherlock-holmes-the-valley-of-fear","title":"शेरलॉक होम्स : द व्हॅली ऑफ फीअर","description":"\u003cp\u003e‘बर्‍याचदा सत्यकल्पनेपेक्षाही थरारक असतं!’- शेरलॉक होम्स.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्स समोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अकराळविकराळ दरी...‘द व्हॅली ऑफ फिअर’....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36739043197087,"sku":"698","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/698f.jpg?v=1603269801"},{"product_id":"malakaaitchi-manjusha","title":"मालाकाईटची मंजुषा","description":"\u003cp\u003eउराल पर्वतातील रशियन लोककथा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e‘मालाकाईट ’ नावाचा हिरवानिळा, मोरपिशी रंगाचा दगड रशियातल्या उराल परिसरातल्या तांब्याच्या समृद्ध खाणींमध्ये सापडतो. या खडकांतल्या रंगछटांमुळे हा दगड कोरीव वस्तू, विलासी वस्तू, अलंकार यांसाठी रशियात फारच प्रसिद्ध आहे. या परिसरात या खडकाच्या बरोबरच अनेक रत्नं, मौल्यवान धातूही सापडतात. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या खाणींच्या परिसरातल्या जमीनदारांच्या, झारच्या गुलामीत काम करणारे खाणकामगार, त्यांची कुटुंबं आणि गावं यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण समाजजीवन होतं. त्यांच्या कष्टपूर्ण जीवनात घडीभर विसावा देणार्या अनेक कहाण्या, लोककथा  आहेत. ‘ताम्रपर्वताची राणी’ हे त्यातलं प्रमुख पात्र. सुंदर, मायावी, न्यायी असं हे काल्पनिक व्यक्तिमत्त्व या कथांतून एखाद्या कोपिष्ट देवीची भूमिका बजावतं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  ‘पावेल बाज्झोव’ या लेखकाने या सर्व कहाण्या एकत्र करून लिहिल्या आणि त्यामुळे जगाला एका वेगळ्याच प्रकारच्या कल्पनारम्य कथांची देणगी मिळाली.  यातल्या ‘मालाकाईटची मंजुषा’ आणि ‘पाषाणपुष्प’ या कथा तर रशियन कलाकारांनी नाट्यकृती, चित्रपट आणि रंगचित्रं अशा त्रिविध माध्यमांतून जिवंत केल्या आहेत. यातल्या अनेक कलाकृती इंटरनेटवर, यू ट्यूबवरही पाहायला मिळतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  उरालच्या या आगळ्या वेगळ्या आणि प्राचीन लोककथा लहानांबरोबरच मोठ्यांनाही आवडतील, इतक्या मनोरम आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36740314300575,"sku":"711","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/711f.jpg?v=1603274196"},{"product_id":"the-sign-of-four","title":"शेरलॉक होम्स : द साईन ऑफ फोर","description":"\u003cp\u003eभारतात लपवलेला गुप्त खजिना...लंडनमध्ये बार्थोलेमी शोल्टोचा विचित्रपणे खून...अंदमानमध्ये सजा भोगणारे चार जण...आणि मिस मॉर्स्टनला दरवर्षी मिळणारी निनावी भेट...या सगळ्या रहस्यमय गोष्टींना जोडणारा एकच समान दुवा; जुनाट नकाशावर केलेली खूण - ‘द साइन ऑफ फोर’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"जेव्हा सगळ्या अशक्य गोष्टी वजा होतात तेव्हा,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअवघड वाटत असली तरी उरलेली गोष्टच निखळ सत्य असते.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- शेरलॉक होम्स\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36961886240927,"sku":"743","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/743f.jpg?v=1605003184"},{"product_id":"our-kind-of-traitor","title":"आवर काइंड ऑफ ट्रेटर","description":"\u003cp\u003eआवर काइंड  ट्रेटर ही जॉन ले कारे यांच्या रहस्यमय कादंबर्यांच्या शृंखलेतील बाविसावी कादंबरी. थरारनाट्याची एक अद्भुत अनुभूती !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eपेरी आणि गेल हे प्रेमी जोडपं, कॅरीबियनमध्ये सुटी घालवायला येतं आणि तिथे त्यांना भेटतो, दिमा नामक एक रशियन अब्जाधीश. तिथून सुरू होतो त्यांचा विलक्षण थरकाप उडवणारा, भयचकित करणारा प्रवास. दिमा, काळ्या दूनियेचा बादशहा !  गूढ आणि भेदरलेला. त्याला आशा आहे, केवळ पेरीच त्याला वाचवू शकतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eब्रिटिश गुप्तहेर संघटनेचे सदस्य, पेरी व गेलची कसून चौकशी करत आहेत. सारे सरकारी कायदे धाब्यावर बसवून त्यांची खलबतं सुरू आहेत. ब्रिटिश सरकारचा प्रचंड पैसा पणाला लागलेला आहे व त्यावर पाणी सोडणं सरकारला परवडणारं नाही. मग अशा वेळी एक-दोघांच्या आयुष्याचा बळी क्रमप्राप्त ठरतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eदेशोदेशी खोलवर रुतलेला काळ्या पैशांचा व्यापार, तस्करी, भ्रष्टाचार, हिंसा, राजकीय कुरघोडी यांचं मर्मभेदी चित्रण एकीकडे वाचकाला खिळवून ठेवतं; तर दूसरीकडे आरपार हादरवून सोडतं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eहेच या कादंबरीच्या भरघोस यशाचं गमक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36962139766943,"sku":"747","price":280.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/747f.jpg?v=1605004875"},{"product_id":"the-hunger-games","title":"द हंगर गेम्स","description":"\u003cp\u003eद हंगर गेम्स जगप्रसिद्ध कादंबरीचा मराठी अनुवाद. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36962152153247,"sku":"756","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/756f.jpg?v=1605004954"},{"product_id":"mission-bharat","title":"मिशन भारत","description":"\u003cp\u003e‘मिशन भारत’ ही राजकीय घटनांवर आधारित थरारक कादंबरी आहे. भारताचा भाग असलेला काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तानची दहशतवादी धडपड, भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, सतत घडवून आणले जाणारे बॉम्बस्फोट्स आणि त्यामुळे भारताच्या राजकीय पटलावर आणि लष्करी तसेच गुप्तहेर संघटनेवर निर्माण झालेला ताण हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ‘धर्म’ या भावनेच्या आधारे विध्वंसक कामासाठी तरुणांचा होणारा दुरुपयोग, या विध्वंसक दहशतवादी कारवायांमुळे बळी जाणारी सामान्य जनता आणि या जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय गुप्तहेर संघटनेचे चालणारे अहोरात्र प्रयत्न, तसेच त्या अनुषंगाने राजकीय, आर्थिक आणि धार्मिक स्तरावर चालणारी उलथापालथ हे सर्व काल्पनिकरीत्या या कादंबरीतून वेगाने उलगडत जाते.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37403805352095,"sku":"794","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/794f.jpg?v=1609230398"},{"product_id":"sherlock-holmes-cha-punaragaman","title":"शेरलॉक होम्सचं पुनरागमन","description":"\u003cp\u003eर्‍हाईनबाक धबधब्यावरून शेरलॉक कोसळल्यावर असं वाटत होतं, जणू या जगातून तो नाहीसा झाला..जितक्या रहस्यमयरीत्या तो गायब झाला तितक्याच रहस्यमयरीत्या तो तीन वर्षांनी परत आलाय. अनेक थरारक कामगिर्‍या त्याची आणि त्याचा साथीदार वॉटसनची वाट बघतायत; पण आता होम्सचा सामना त्याच्या सर्वांत क्रूर प्रतिस्पर्ध्याशी आहे : चार्ल्स ऑगस्टस मिल्वर्टन.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जगभरातल्या सगळ्या वाचकांचं सर्वांत लाडकं काल्पनिक पात्र, म्हणजे शेरलॉक होम्स! सर आर्थर कॉनन डॉयल यांनी कथा-जिवंत केलेला हा भन्नाट डिटेक्टिव्ह केवळ असामान्य बुद्धी आणि तर्काच्या जोरावर चक्रावून टाकणार्‍या रहस्यांचा उलगडा करतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या संग्रहात अशाच रोमांचक रहस्यकथांमधून तो आपल्याला भेटणार आहे आणि आणखीच चक्रावून टाकणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37405029761183,"sku":"809","price":156.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/809f.jpg?v=1609239073"},{"product_id":"sherlock-holmse-chya-rahasyakatha","title":"शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा","description":"\u003cp\u003eसुरुवातीला तिला कसलीही जखम दिसली नाही; पण तिनं त्याला उठवायचा प्रयत्न करताच तिला त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला वाहत असलेलं रक्त दिसलं. त्याला छोटीशीच, पण खूप खोल जखम झाली होती. तिने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडल्यावर त्याने क्षणभरा डोळे उघडले.‘प्राध्यापक -ती होती’, तो पुटपुटला. त्यानं आणखी काहीतरी बोलण्याचा अतोनात प्रयत्न केला; पण त्यानंतर तो लगेचच मरण पावला. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e शेरलॉक होम्सच्या कथांमधून वाढत जाणारी रहस्यामायाता वाचकाची उत्सुकता शिगेला पोहोचवते. वरकरणी थेट वाटणार्‍या खुनांची अजब गुंतागुंत सर आर्थर कॉनन डॉयल शेरलॉक होम्सच्या माध्यमातून अधिक जिवंत आणि रोमांचक करतात आणि वाचकाला अक्षरश: खिळवून ठेवतात!\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37405031465119,"sku":"811","price":156.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/811f.jpg?v=1609239083"},{"product_id":"the-call-of-the-wild","title":"द कॉल ऑफ द वाईल्ड","description":"\u003cp\u003e‘द कॉल ऑफ द वाइल्ड’ ही युकॉनच्या बर्फमय प्रदेशातल्या बक नावाच्या एका कुत्र्याची त्याच्याच दृष्टिकोनातून सांगितलेली कहाणी आहे. सुसंस्कृतपणाकडून आदिम हिंस्रपणाकडे त्याने केलेल्या प्रवासाचा हा लेखाजोखा आहे; पण या श्वानाच्या रोमांचक कथेतून आपल्यासमोर एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी सोन्याच्या हव्यासाने कॅनडामधल्या क्लोंडाईक प्रातांत गोळा झालेल्या लोकांचं जग उभं राहतं. एकीकडे हिंसक आणि निष्ठुर जगाचं वर्णन करणारी ही कथा दुसरीकडे माणसाच्या आणि प्राण्याच्या नात्याविषयी सांगितलेली एक हळुवार साहसकथाही आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मुक्या प्राण्यांवर अतोनात प्रेम करणार्‍या लंडनला स्लेडला जुंपल्या जाणार्‍या कुत्र्यांच्या मनीची व्यथा उमजून आली आणि अपार कणवेने भारून, श्वानजीवनाचे अंतरंग उलगडून दाखविणारी ‘बकची’ कहाणी त्याने जगापुढे मांडली. जगभरातल्या साहित्याप्रेमींमध्ये तुफान लोकप्रिय असलेली आणि निर्विवादपणे ‘अभिजात’ ठरलेली ही कथा आता मराठी वाचकांच्याही भेटीला येत आहे. ही कहाणी वाचकांना मोहून टाकते, थरारून सोडते आणि विचार करायलाही भाग पाडते.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37405032218783,"sku":"812","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/812f.jpg?v=1609239088"},{"product_id":"the-count-of-monte-cristo","title":"द काऊंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो","description":"\u003cp\u003e१०० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आलेक्झान्द्र द्यूमास यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद \n\u003cbr\u003eसगळ्यांचं भलं चिंतणार्‍या, हुशार आणि साध्या-सरळ एडमंड डान्टेला लवकरच जहाजाच्या कप्तानपदी बढती मिळणार असते. मग तो जिवापाड प्रेम असणार्‍या त्याच्या प्रेयसीशी लग्न करून सुखाने संसार थाटणार असतो; पण डान्टेकडे असलेल्या एका पत्राने त्याच्या आयुष्यात अचानक एक भयंकर वादळ घोंगावत येतं आणि त्याचं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकतं. जिगरबाज एडमंड डान्टेशी दगाफटका करून त्याचे शत्रू त्याला एका गुप्त तुरुंगाच्या काळकोठडीत डांबून टाकतात आणि सर्वस्व गमावून अवघं आयुष्य त्या अंधार्‍या तुरुंगात घालवणं त्याच्या नशिबी येतं !\n\u003cbr\u003eडान्टेच्या सगळ्या स्वप्नांचा, इच्छा-आकांक्षांचा चुराडा होतो. तो इतका निराश होतो की, आत्महत्येचा विचार करायला लागतो; पण तोच त्याला एक आशेचा किरण दिसतो, ज्यामुळे त्याची तुरुंगातून चमत्कारिकरीत्या सुटका होते; पण तुरुंगातून बाहेर पडलेला डान्टे पूर्वीचा ‘साधा-सरळ’ डान्टे राहिलेला नसतो. तो झालेला असतो, हुशार, कपटी आणि सुडाच्या आगीने पेटलेला - ‘द काउन्ट ऑफ मॉन्टे कि‘स्टो’! \n\u003cbr\u003eआलेक्झान्द्र द्यूमासच्या जवळपास सगळ्या कादंबर्‍या नेपोलियनच्या वादळी पर्वाच्या पार्श्वभूमीवर घडतात. त्यांपैकी ‘द काउन्ट ऑफ मॉन्टे कि‘स्टो’ ही थरारक साहसकथा जगातल्या सर्वांत लोकप्रिय रोमांचक कादंबर्‍यांपैकी एक गणली जाते. ऐश्वर्याच्या, प्रभावाच्या शिखरावर असलेल्या नेत्रदीपक, जोशपूर्ण फ‘ांसचं कादंबरीतलं वर्णन अजरामर ठरलं आहे. तसंच सुष्ट-दुष्ट यांच्यातला नाट्यमय संघर्ष आणि विलक्षण गुंतागुंतीचं कथानक असल्याने ही कादंबरी वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवते !\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37423683797151,"sku":"815","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/815f.jpg?v=1609393798"},{"product_id":"the-three-musketeers","title":"द थ्री मस्कटिअर्स","description":"\u003cp\u003eविख्यात कादंबरीकार आलेक्झान्द्र द्यूमासलिखित ‘द थ्री मस्कटिअर्स’ या रोमांचक, नाट्यमय कादंबरीचा मराठी अनुवाद !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  ही कथा आहे दार्तान्यॉ या शूर तरुणाची आणि त्याच्या धाडसी मोहिमांची ! फ्रान्सच्या राजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या शिलेदारांच्या म्हणजेच मस्कटिअर्सच्या तुकडीमध्ये सामील व्हायचं स्वप्न घेऊन दार्तान्यॉ पॅरिसमध्ये येतो आणि त्याची मैत्री ऍथॉस, पार्थोस आणि आरामिस या मस्कटिअर्सशी होते. राजाचा मित्र कार्डिनल रिशलिय आणि रमणी गुप्तहेर मिलेडी यांच्या छुप्या आणि धूर्त कारस्थानांपासून राजाचे प्राण आणि त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मस्कटिअर्सना प्रयत्नांची शर्थ करावी लागते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  रहस्य, षड्यंत्र, थरार, विस्मयकारक घटना, तलवारबाजीच्या अखंड करामती, प्रेमप्रकरणं, गनिमी छापे, जिवानिशी झालेल्या सुटका आणि बेफाम साहसं असा सगळा ऐवज या अजरामर कादंबरीमध्ये पानोपानी वाचायला मिळतो ! द्यूमासने साकारलेल्या या कादंबरीतल्या जगात अशक्य काहीच नाही. तसंच सगळं काही भव्यदिव्य आहे!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  त्या काळातली राजकीय समीकरणं आणि परिस्थिती यांच्या गुंफणीतून आकाराला आलेली, कधीही संपू नये असं वाटायला लावणारी एक अभिजात कादंबरी खास ‘वर्ल्ड क्लासिक्स सीरिजमधून’ वाचकांच्या भेटीला आली आहे !\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37424604020895,"sku":"851","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/851f.jpg?v=1609404324"},{"product_id":"the-strange-case","title":"द स्ट्रेंज केस ऑफ डॉ जेकिल अँड मि हाईड","description":"‘‘माणसाची ओळख जसजशी पटत जाते, तसतसे सगळेच सुष्ट-दुष्ट वृत्तींच्या अनोख्या मिश्रणातून उगवलेले आहेत, हे कळत जाते...’’\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअटरसन वकील दूरच्या नात्यातल्या एनफिल्ड यांच्यासोबत लंडनच्या गल्ल्यांमधून फेरफटका मारत असतात. तेव्हा एनफिल्ड काही महिन्यांपूर्वी स्वत: अनुभवलेल्या एका बीभत्स घटनेविषयी त्यांना सांगतात. ही गोष्ट असते, बघताच भीती वाटावी अशा मि. हाईडची! हा हाईड एका लहान मुलीला आधी निर्दयपणे तुडवतो आणि मग एका गूढ घराच्या दारामागे गुप्त होतो. काही क्षणानंतर मुलीच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई म्हणून द्यायच्या रकमेचा चेक घेऊन अवतरतो. त्या चेकवर एका अत्यंत प्रतिष्ठित सद्गृहस्थाची सही असते. पुढे कळतं, हा प्रतिष्ठित माणूस म्हणजे दुसरा-तिसरा कुणी नव्हे, तर अटरसन यांचा एक जुना मित्र आणि अशीलही असणारा डॉ. जेकिल असतो.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमग मि. हाईड कोण?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eडॉ. जेकिल कोण?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eया दोघांना जोडणारं काही रहस्य तर नसेल? काही गूढ...\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eरॉबर्ट स्टीव्हन्सनची अतिशय झपाटून टाकणारी ही गोष्ट वाचकांना गोंधळात टाकणारं एक कोडं घालते आणि शेवटी रहस्यावरचा पडदा उघडते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eचांगल्या-वाइटाची अभिजात म्हणावी अशी ही भयकथा एकोणिसाव्या शतकातल्या मूलभूत विरोधाभासाविषयी भाष्य करते. बाहेरून प्रतिष्ठेची आणि आतून तीव्र लालसेची आस असणार्‍या माणसामधल्या विरोधाभासाचं चित्रण करणारी, ‘व्हिक्टोरियन एरा’मधलं अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शी लेखन मानली जाणारी ही लघुकादंबरी इंग्रजी वाङ्मयातली ‘वाचकप्रिय कादंबरी’ म्हणून आपलं स्थान आजही राखून आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":41488827318431,"sku":"1013","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/1013f.jpg?v=1637137655"},{"product_id":"maneaters-of-kumaon","title":"कुमाऊँचे नरभक्षक","description":"\u003cp\u003eउताराच्या अगदी कडेला असताना गवताचा भारा बांधायला मी खाली वाकलो, तेवढ्यात वाघाने माझ्या अंगावर उडी घेतली आणि त्याच्या चार सुळ्यांपैकी एक माझ्या उजव्या डोळ्याखाली, दुसरा माझ्या हनुवटीमध्ये आणि उरलेले दोन माझ्या मानेत रुतवले. मी पाठीवर पडलो आणि वाघ माझ्या छाताडावर होता. त्याचं पोट माझ्या पायांवर होतं. पाठीवर पडताना माझे हात पसरले गेले होते. माझ्या उजव्या हाताला ओकचं एक रोपटं लागलं...तेव्हाच माझ्या मनात एक कल्पना चमकली - वरच्या बाजूला असलेलं ते ओकचं रोपटं मी हातांनी पकडलं असतं आणि मोकळे असलेले दोन्ही पाय जुळवून वाघाच्या पोटाला टेकवले असते, तर मी त्याला लांब ढकलू शकलो असतो आणि पळून जाऊ शकलो असतो. वाघाला अजिबात जाणवू न देता मी अगदी हळूहळू माझे दोन्ही पाय वर घेतले आणि त्याच्या पोटांवर टेकवले. त्यानंतर माझा डावा हात वाघाच्या छातीवर टेकवला आणि सगळ्या ताकदीनिशी त्याला विरुद्ध दिशेने ढकललं.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिम कॉर्बेट यांच्या या शिकार कथा अत्यंत चित्तवेधक आहेत. मात्र शिकार कथा म्हणजे रूढार्थाने ‘शिकारीचा आनंद देणार्‍या कथा’ असा यांचा बाज नाही. कॉर्बेट यांची वाघाबद्दलची आत्यंतिक आत्मीयता, अभ्यास आणि शिकार करतानाची तितकीच अगतिकताही या कथा वाचताना सतत जाणवत राहते. म्हणूनच या कथा थरारक असल्या, तरी त्यांच्यात उन्माद नाही. थरार अनुभवताना वाघाबद्दल आणि एकूणच प्राणिजीवनाबद्दल त्या वाचकाला समंजस केल्याशिवाय राहत नाहीत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":41556190462111,"sku":"1015","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/1015f.jpg?v=1638253030"},{"product_id":"devalacha-wagh","title":"देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक | Temple Tiger | जिम कॉर्बेट | Jim Corbett","description":"\"“नरभक्षक वाघाला मारण्याचं काम मनाला अतिशय समाधान देतं, यात शंकाच नाही. ‘जे काम कुणीतरी करणं अत्यावश्यक होतं आणि आपण ते केलं’ याचं ते समाधान असतं. आपण आपल्या बलाढ्य शत्रूला त्याच्याच परिसरात जाऊन मात दिल्याचं समाधान असतं; आणि या सगळ्याच्या पलीकडे, पुतळीसारख्या धाडसी मुलीला वावरण्यासाठी पृथ्वीवरचा लहानसा का होईना, एक कोपरा सुरक्षित केल्याचं समाधान असतं.”\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eनरभक्षक वाघांची प्रचंड दहशत बसलेल्या, दुर्गम म्हणाव्या अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये कॉर्बेट यांनी केलेल्या वाघांच्या शिकारींमागची त्यांची ही प्रामाणिक भावना आहे. साहजिकच, या सगळ्या शिकारकथा थरारकच आहेत. मात्र वाघाची शिकार करणार्या या माणसाची माणसाइतकीच वाघाबाबतची संवेदनशीलता अनेकदा रोमांचित करते आणि कॉर्बेट यांचं वेगळेपणदेखील अधोरेखित करते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eम्हणूनच ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलाचं जिवंतपण, सळसळतेपण आणि रांगडा पण नितळ कारभार हा माणूस ज्या तरलेतेने टिपतो, त्यातून ‘शिकारी’ या काहीशा आक्रमक चौकटीच्या कितीतरी योजनं तो पुढे जातो आणि माणसाच्या ‘विकसित’ म्हणवल्या जाणार्या मेंदूमुळे निर्माण झालेल्या अनेक वर्तन विसंगती, त्याच्या मनातल्या सूक्ष्मात रुतून बसलेलं मतलबी क्रौय यांना सहज, नर्मविनोदीपणे पृष्ठभागावर आणतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eत्यामुळेच ‘थरारक’ म्हणून या कथा आनंद देतातच, पण त्याच वेळी कॉर्बेटबरोबर त्या आपल्यालाही खोल जंगलात उतरायला भाग पाडतात आणि त्याहूनही पुढे जात ‘माणूस’ नावाच्या रसायनाबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करतात.\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":42317087703199,"sku":"1027","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/1027f.jpg?v=1656048879"},{"product_id":"sherlock-complete-novels","title":"शेरलॉक होम्सच्या समग्र कादंबऱ्या (चार पुस्तकांचा संच)","description":"सर आर्थर कॉनन डॉयल (१८५९-१९३०) हे स्कॉटिश लेखक होते. त्यांनी जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी निर्माण केलेलं ‘शेरलॉक होम्स’ हे काल्पनिक पात्र आजही जगातल्या सर्वांत लोकप्रिय नायकांपैकी एक आहे. त्यांच्या कामाचा आवाका अफाट होता. त्यांनी २००हून अधिक कथा, कादंबर्‍या, कविता, नाटकं इत्यादींचं लेखन केलं. त्यात शेरलॉक होम्स मालिकेतल्या ४ कादंबर्‍या आणि ५ कथासंग्रहांचासमावेश आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eरहस्यकथा-लेखनातला एक मापदंड म्हणून आजही जगभर या कादंबर्‍या ओळखल्या जातात. त्यांच्या लिखाणावर आजवर अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, नाटकं रचली गेली आहेत. एक शतकाहून अधिक काळ लोटून गेल्यानंतरही लहान-मोठे वाचक त्यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथांचा मनमुराद आस्वाद घेत आहेत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e1. द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e2. अ स्टडी इन स्कार्लेट\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e3. द व्हॅली ऑफ फीअर\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e4. द साईन ऑफ फोर\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eMarathi translation of four Sherlock Holmes novels  1. The Hound of the Baskervilles, 2. A study in Scarlet, 3. The Valley of Fear , 4. The Sign of Four\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":42995509952671,"sku":"1046","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/1046.jpg?v=1677911953"},{"product_id":"rudraprayag","title":"रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्या | सुप्रसिद्ध शिकारी व निसर्गसंवर्धक जिम कॉर्बेटच्या अजरामर शिकारकथा","description":"\u003cp\u003eएका अवलिया शिकार्‍याच्या या अजब शिकारकथा आहेत. या थरारक आहेत, पण फक्त थराराचाच अनुभव देणार्‍या कथा नाहीत. माणूस आणि प्राणी यांच्यातला निसर्ग सांगणार्‍या, त्यांच्यातली पेचात टाकणारी समीकरणं दर्शवणार्‍या कथा आहेत. आजच्या गतिमान युगाला अपेक्षित टिपेच्या अनुभवाची कुठलीही कळ त्या दाबत नाहीत, पण पाऊलही न वाजवता निसर्गासोबतच्या दीर्घ प्रवासाची खुमारी आणि त्याच्या सूक्ष्म निरीक्षणांचे अमीट तरंग त्या मनावर उमटवल्याशिवाय राहत नाहीत.\u003cbr\u003eखड्ड्यात मरून पडलेला बिबट्या नरभक्षकच असल्याचं सिद्ध करण्यासाठीचा कोणताही पुरावा माझ्यासमोर नव्हता, पण तो नरभक्षक बिबट्याच असल्याचं समजायला मला एका सेकंदाचाही वेळ लागला नव्हता. मात्र तो त्या पंडितच्या भाषेतला कुणी सैतान नव्हता. मला रात्र रात्र जागायला लावून कुठूनतरी मला बघत असलेला, त्याला मारण्याचे माझे प्रयत्न व्यर्थ चाललेले बघून विकट हसत असलेला, माझ्या बेसावध होण्याची जिभल्या चाटत वाट बघणारा, माझ्या गळ्यात आपले सुळे रोवायच्या संधीची वाट बघत असणारा कुणी दुष्ट प्राणी नव्हता. इथे तर एक साधा, वय झालेला बिबट्या मरून पडला होता. त्याचा गुन्हा एकच होता. तोही निसर्गाच्या कायद्याच्या विरुद्ध केलेला गुन्हा नव्हता, तर मानवतेच्या विरुद्ध केलेला गुन्हा होता. तो म्हणजे, त्याने माणसाचं रक्त सांडलं होतं. त्यातून त्याला माणसांमध्ये दहशत माजवायची होती, असंही नव्हतं. तर त्याला स्वत:ला जगायचं होतं. त्यासाठी त्याने हे सगळे उद्योग केले होते!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi translation of Man-eating Leopard of Rudraprayag by Jim Corbett. Translation by Vaishali Chitnis\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":43109368922271,"sku":"1047","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1047fRudrapyagchaNarbhakshakBibtya.jpg?v=1683542538"},{"product_id":"raduga","title":"रादुगा - अंतोन चेखवच्या निवडक रशियन कथा","description":"\"चेखव हा माणसावर आणि जीवनावर – त्यांतल्या चांगल्या आणि वाइटासह - शतदा प्रेम करणारा कलाकार आहे. ‘प्रजाती’ म्हणून माणूस कसा आहे, तो एखाद्या परिस्थितीत नेमका कसा वागतो, याचं त्याला भारी कुतूहल! म्हणूनच ‘सामान्य माणूस’ हे त्याच्या कथांचं केंद्रक बनतं. तरीपण एकविसाव्या शतकातल्या मराठी वाचकाने रशियासारखी भिन्न संस्कृती असलेल्या, दूरवरच्या भूमीतल्या, साधारणत: १३०-१४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथा आज का म्हणून वाचाव्यात? उत्तर तसं सोपं आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eकाळवेळाचं गणित लांघून या कथांशी स्वत:ला जोडून घेता येतं. आपलच जगणबाबत त छोट्या-मोठ्या कहाण सांगतात; कदाचित आपल नजरेतून सुटलेल आपलच दुर्गुणांवर, विसंगतींवर बोट ठेवतात. आपलभोवती आपणच विणलेले अदृश् कोश दाखवतात. अगदी हलक्या-फुलक्या विनोदापासून जगण्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तत्त्वज्ञानात्’क गंभीर भाष्य करणारा चेखव ह्या कथांमधून आपल्यापर्यंत पोहोचत जातो. माणसांच्या गोष्टी’ हा त्याच्या कथांचा आत्मा आहे. म्हणूनच त्या वाचताना चेखवची मानवी जीवनाबद्दलची सर्वत्र व्यापून राहिलेली कलात्मक जाणीव वाचकाला होत राहते.\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":44739230433439,"sku":"1073","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1073raduga-anton-chekhov-3d.jpg?v=1702976228"},{"product_id":"jungle-lore-ani-tree-tops","title":"जंगल लोर आणि ट्री टॉप्स  | Jungle Lore ani Tree Tops | Jim Corbett in Marathi","description":"\u003cdiv class=\"gs\" style=\"margin: 0px; min-width: 0px; padding: 0px 0px 20px; width: initial; color: rgb(34, 34, 34); font-family: 'Google Sans', Roboto, RobotoDraft, Helvetica, Arial, sans-serif; font-size: medium; font-style: normal; font-variant-ligatures: normal; font-variant-caps: normal; font-weight: 400; letter-spacing: normal; orphans: 2; text-align: start; text-indent: 0px; text-transform: none; widows: 2; word-spacing: 0px; -webkit-text-stroke-width: 0px; white-space: normal; background-color: rgb(255, 255, 255); text-decoration-thickness: initial; text-decoration-style: initial; text-decoration-color: initial;\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003cdiv id=\":3dn\" class=\"ii gt\" style=\"direction: ltr; margin: 8px 0px 0px; padding: 0px; position: relative; font-size: 0.875rem; overflow-x: hidden;\" jslog=\"20277; u014N:xr6bB; 1:WyIjdGhyZWFkLWY6MTgwNjA4Mzg1NDUyMTk1OTI2OCJd; 4:WyIjbXNnLWY6MTgwNjA4Mzg1NDUyMTk1OTI2OCJd\"\u003e\n\u003cdiv id=\":3do\" class=\"a3s aiL\" style=\"direction: initial; font: small \/ 1.5 Arial, Helvetica, sans-serif; overflow: auto hidden; position: relative;\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eआता माझ्यापासून वीस यार्डांवर एक वाघ उभा होता. त्याच्या त्या सुंदर, चमकदार त्वचेवर हिवाळ्यातलं ऊन पडून ती आणखी चमकत होती. असं छायाचित्र मिळवण्यासाठी मी एरवी कुठेही गेलो असतो आणि काहीही दिलं असतं. मी अनेकदा तासन्तास किंवा दिवसच्या दिवस वाघाच्या मागावर राहिलो आहे आणि तो दिसल्यावर रायफल उंचावून, काळजीपूर्वक नेम धरून ती तशीच खाली घेतली आहे. नंतर त्या वाघाचं लक्ष वेधून घेऊन, डोक्यावरची टोपी उचलून त्याला अभिवादन केलं आहे. मला त्याला पाहण्याचा मिळालेला आनंद मी या पद्धतीने व्यक्त केला आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\n\u003cdiv\u003eरूढार्थाने ‘शिकारी’ असणार्‍या या माणसाचा प्रवास म्हणूनच शूटिंगपासून शूटिंगपर्यंत (शिकारीपासून चित्रीकरणापर्यंत) पोहोचल्याचं लक्षात येतं. शिकार करण्याने त्याला सावध, अभ्यासू आणि चिकित्सक केलं असलं, तरी हे सजगपण त्याला केवळ निसर्गाचा उपभोग घ्यायला शिकवत नाही... उलट ही त्याच्या निसर्गात विरघळत जाण्यासाठीची नांदी ठरते.\n\u003cdiv class=\"yj6qo\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46189474513055,"sku":"1097","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1097-junglelore-3d.jpg?v=1722413647"},{"product_id":"mudrikeche-sathidar","title":"मुद्रिकेचे साथीदार | Mudrikeche Sathidar (The Lord of the Rings-Part-1) | जे. आर. आर. टॉल्कीन, अनुवाद : मुग्धा कर्णिक","description":"\u003cp\u003eजे. आर. आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (The Lord of the Rings) या महाकादंबरीचा ‘मुद्रिकेचे साथीदार’ हा पहिला भाग आहे. \u003cbr\u003eकृष्णशक्तीचा स्वामी सॉरॉन याने शक्तिमान मुद्रिका मिळवल्या आहेत. या मुद्रिकांच्या जोरावर तो मध्य-वसुंधरेवर अधिराज्य गाजवू इच्छितो. या सर्व मुद्रिकांवर अंमल असलेली सर्वशक्तिमान मुद्रिका मात्र त्याच्याकडे नाही. ती बिल्बो बॅगिन्स नावाच्या हॉबिटला गवसली आहे.\u003cbr\u003eशायरमधील एका सुस्त गावात, म्हातार्या बिल्बोचा तरुण पुतण्या फ्रोडो बॅगिन्स याच्या समोर एक मोठी कामगिरी उभी राहिली आहे. बिल्बोने ती मुद्रिका त्याच्याकडे सुपुर्द केली आहे. स्वतःचं घर सोडून फ्रोडोला मध्य-वसुंधरेच्या भूप्रदेशांमधून विपदांनी भरलेल्या वाटा धुंडाळत अंतःपर्वताच्या टोकावरच्या अग्निरसाच्या खाईपर्यंत जाणं भाग आहे. तिथे जाऊन ती मुद्रिका नष्ट केल्यावरच कृष्णशक्तीच्या स्वामीचा पाडाव होणार आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi translation of The fellowship of the rings by J R R Tolkien. Translated in Marathi by Mughda Karnik. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":55553191968927,"sku":"1125","price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1125fellowshipofthering3d.jpg?v=1736498290"},{"product_id":"te-don-manore","title":"ते दोन मनोरे | Te Don Manore (The Lord of the Rings-Part-2) | जे. आर. आर. टॉल्कीन, अनुवाद : मुग्धा कर्णिक","description":"\u003cp\u003eजे. आर. आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (The Lord of the Rings) या महाकादंबरीचा ‘ते दोन मनोरे’ हा दुसरा भाग आहे.\u003cbr\u003eकृष्णशक्तीचा साथीदार सॉरॉनच्या हाती सर्वशक्तिमान मुद्रिका पडू नये म्हणून ती अंतःपर्वताच्या टोकावरच्या अग्नीरसाच्या दरीत नष्ट करण्याच्या कामगिरीवर फ्रोडो आणि मुद्रिकेचे साथीदार निघाले आहेत. वाटेत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मोरियाच्या खाणीत एका दुष्टात्म्याशी लढा देताना त्यांना जादूगार गॅन्डाल्फला गमावावं लागतं. रौरॉसच्या धबधब्यापाशी मुद्रिकेच्या शक्तीच्या मोहात पडून बोरोमीर ती बळाने काबीज करण्याचा प्रयत्न करतो. इतर साथीदारांवर ऑर्क्सचा हमला झाला असतानाच फ्रोडो आणि सॅम तिथून वेगळ्या मार्गाने प्रवास सुरू करतात.\u003cbr\u003e आता महानदी अँड्युइनच्या काठाने एकटा प्रवास करत असताना एक गुढ व्यक्ती त्यांचा सतत पाठलाग करत आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi translation of The Two Towers by J R R Tolkien. Translated in Marathi by Mughda Karnik. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":55553201668255,"sku":"1126","price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1126-ThetwotwoersPPB-3d.jpg?v=1736498713"},{"product_id":"rajache-punaragaman-the-lord-of-the-rings-part-3","title":"राजाचे पुनरागमन | Rajache Punaragaman (The Lord of the Rings-Part 3) | जे. आर. आर. टॉल्कीन, अनुवाद : मुग्धा कर्णिक (Copy)","description":"\u003cp\u003eजे. आर. आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (The Lord of the Rings) या महाकादंबरीचा ‘राजाचे पुनरागमन’ हा तिसरा आणि अंतिम भाग आहे.\u003cbr\u003e मुद्रिकेचे साथीदार वेगवेगळ्या मोहिमांमध्ये गुंतले आहेत. अॅरगॉर्न प्राचीन राजांचा वारस म्हणून पुढे आला आहे. रोहॅनच्या अश्वयोद्ध्यांच्या साथीने तो आयसेनगार्डच्या सैन्याशी लढाई करून हॉनबर्ग इथे विजय संपादित करतो. ऑर्क्सच्या ताब्यातून निसटून मेरी आणि पिपीन कॅनगॉर्नच्या जंगलात शिरतात आणि त्यांची एन्टसशी भेट होते. गॅन्डाल्फ चमत्कारिकरित्या परत येऊन दुष्ट जादूगार सारूमानचा पराभव करतो.\u003cbr\u003e इकडे सॅम आणि फ्रोडो मुद्रिका नष्ट करण्यासाठी मॉर्डॉरच्या दिशेने वाट काढत आहेत. आता स्मिगल उर्फ गॉल्लम त्यांच्या सोबतीला आहे. अजूनही तो त्याच्या ‘अनमोल सोनुली’मागे वेडापिसा आहे. शीलॉब या महाकाय कोळ्याशी झुंज दिल्यानंतर सॅम त्याच्या मालकाला मृत समजून सोडून देतो, पण फ्रोडो जिवंत आहे आणि तो ऑर्क्सच्या ताब्यात सापडलाय. इकडे कृष्णशक्तीच्या स्वामीच्या फौजा गोळा झाल्या आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi translation of The Return of the King by J R R Tolkien. Translated in Marathi by Mughda Karnik. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":55553526333599,"sku":"1127","price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1127Returnoftehking3d.jpg?v=1736499186"},{"product_id":"my-india","title":"माय इंडिया  | My India | जिम कॉर्बेट | Jim Corbett","description":"\u003cdiv style=\"margin: 0px; min-width: 0px; padding: 0px 0px 20px; width: initial; color: rgb(34, 34, 34); font-family: 'Google Sans', Roboto, RobotoDraft, Helvetica, Arial, sans-serif; font-size: medium; font-style: normal; font-variant-ligatures: normal; font-variant-caps: normal; font-weight: 400; letter-spacing: normal; orphans: 2; text-align: start; text-indent: 0px; text-transform: none; widows: 2; word-spacing: 0px; -webkit-text-stroke-width: 0px; white-space: normal; background-color: rgb(255, 255, 255); text-decoration-thickness: initial; text-decoration-style: initial; text-decoration-color: initial;\" class=\"gs\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003cdiv style=\"direction: ltr; margin: 8px 0px 0px; padding: 0px; position: relative; font-size: 0.875rem; overflow-x: hidden;\" class=\"ii gt\" id=\":3dn\"\u003e\n\u003cdiv style=\"direction: initial; font: small \/ 1.5 Arial, Helvetica, sans-serif; overflow: auto hidden; position: relative;\" class=\"a3s aiL\" id=\":3do\"\u003e\n\u003cp\u003eसुलताना स्वतंत्र होता, तेव्हा त्याच्या नुसत्या नावानेही चळाचळा कापणार्या लोकांनी त्याला खिल्ली उडवण्याच्या पातळीवर नेऊन ठेवायला नको होतं, त्याच्या हातापायात बेड्याही घालायला नको होत्या, असं मला वाटतं. त्याला थोडी सौम्य शिक्षा द्यायला हवी होती, असंही मला वाटतं. त्याला सामान्य आयुष्य जगण्याची संधीही नाकारली गेली होती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्याच्या हातात सत्ता होती, तेव्हा त्याने कधीही गरिबांना त्रास दिला नव्हता. मी वडाच्या झाडापर्यंत त्याचा पाठलाग केलेला असतानाही त्याने मला आणि माझ्या मित्रांना जीवदान दिलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो फ्रेडीला भेटायला आला, तेव्हा त्याच्या हातात सुरा किंवा बंदूक नव्हती, तर कलिंगड होतं!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपला तर्क, नर्मविनोद शाबूत ठेवून साध्या माणसांमधल्या भावनिकतेला कमी न लेखण्याची, उलट त्यात पातळ होत जाण्याची जिम कॉर्बेटची शक्ती वेध लावणारी आहे! आपण आजच्या जगातले लोक तर्क न लावता येणार्याकडे फार तुच्छतेने पाहतो... माणसाला मोजायची मापं फार बोकाळली! म्हणूनच कदाचित जिम कॉर्बेट आजही वाचला जातो... वाचला जात राहील...\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":62452897775775,"sku":"1152","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1152-my-india3d.jpg?v=1755324658"},{"product_id":"jim-corbett-omnibus","title":"समग्र जिम कॉर्बेट | Samagra Jim Corbett | जिम कॉर्बेट | Jim Corbett","description":"\u003cdiv style=\"margin: 0px; min-width: 0px; padding: 0px 0px 20px; width: initial; color: rgb(34, 34, 34); font-family: 'Google Sans', Roboto, RobotoDraft, Helvetica, Arial, sans-serif; font-size: medium; font-style: normal; font-variant-ligatures: normal; font-variant-caps: normal; font-weight: 400; letter-spacing: normal; orphans: 2; text-align: start; text-indent: 0px; text-transform: none; widows: 2; word-spacing: 0px; -webkit-text-stroke-width: 0px; white-space: normal; background-color: rgb(255, 255, 255); text-decoration-thickness: initial; text-decoration-style: initial; text-decoration-color: initial;\" class=\"gs\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003cdiv style=\"direction: ltr; margin: 8px 0px 0px; padding: 0px; position: relative; font-size: 0.875rem; overflow-x: hidden;\" class=\"ii gt\" id=\":3dn\"\u003e\n\u003cdiv style=\"direction: initial; font: small \/ 1.5 Arial, Helvetica, sans-serif; overflow: auto hidden; position: relative;\" class=\"a3s aiL\" id=\":3do\"\u003e\n\u003cp\u003eजिम कॉर्बेट वंशाने भारतीय नसले, तरी त्यांचा जन्म भारतातल्या नैनितालमध्ये झाला आहे. तसंच आपल्याला ते ‘वाघांचा शिकार करणारा शिकारी’ म्हणून परिचित असले, तरी ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलं, प्राणी, निसर्ग आणि त्याचाच भाग असलेली माणसं असं तो सगळं एकसंध पाहतो. शिकार करतानाची जिम कॉर्बेटची तन्मयता जितकी लोभस आहे, तितकीच त्या प्राण्याबाबतची आत्मीयताही! म्हणूनच या थरारक कथा रूढार्थाने आपल्याला हिंसक भावनेचा प्रत्यय देत नाहीत. उलट त्या माणसातला निसर्ग जागा करणार्या किंवा शाबूत ठेवणार्या कथा आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e या कथा आजही आपल्याला इतकं वेधून का घेतात? कारण पांढरपेशा जगण्यातला चूक-बरोबरचा फास आणि तो आवळण्यासाठीचे गळे या कथांना ठाऊक नाहीत. यांच्या ठायी नर्मविनोद आहे, पण त्यांना उपेक्षा करणं माहीत नाही. त्या उघड्या तोंडाच्या गोष्टी आहेत. राग-लोभासहित माणसातला निसर्ग आणि निसर्गासकटचा माणूस पोटात घेणार्या गोष्टी आहेत. म्हणूनच त्या वाघांच्या शिकारीच्या उत्कंठेसाठी वाचल्या जात असल्या, तरी निश्चितच फक्त वाघांपुरत्या मर्यादित राहत नाहीत... स्वतःतल्या खोल जंगलात उतरायला त्या आपल्याला भाग पाडतात.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":62452901118111,"sku":"1151","price":799.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1151-samagra-jim-corbett3d.jpg?v=1755325220"},{"product_id":"kutrayacha-kalij","title":"कुत्र्याचं काळीज | Kutracha kalij | मिखाइल बुल्गाकव, अनुवाद – इर्शाद वडगांवकर","description":"\u003cp\u003eमिखाइल बुल्गाकवने ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी १९२५ सालच्या हिवाळ्यात लिहिली... साहित्यप्रकार म्हणून ही लघुकादंबरी एक ‘फॅन्टसी’ आणि ‘सामाजिक व्यंग (satire)’ आहे, असं मानलं जातं, परंतु तिची मुळं खूप खोलवर गेलेली दिसून येतील. क्रांतिपश्चात सभोवताली आकारास येत चाललेल्या नवीन जीवनाने रशियन समाजापुढे उभ्या केलेल्या आव्हानांना एका प्रतिभावंत लेखकाने दिलेलं प्रत्युत्तर, त्याबद्दल केलेलं विचारमंथन म्हणजे ही लघुकादंबरी होय. \u003cbr\u003eया लघुकादंबरीत नवीन व्यवस्थेला लेखकाने काढलेले चिमटे नि सत्तेवरचं तीक्ष्ण व्यंग सेन्सॉर मंडळाला दिसलं नसतं, तरच नवल! मंडळाच्या लेखी ते हस्तलिखित क्रांतीवरचं विडंबन ठरलं; पण या भन्नाट लघुकादंबरीचा पैस तितकाच मर्यादित असता, तर तिला रशियात आणि जगभरात इतके वाचक कधीच लाभले नसते. ह्या विलक्षण कथेत लेखकाने उपस्थित केलेले प्रश्न स्थलकालाचा अवकाश भेदून वर्तमानात आपल्यासमोर उभे ठाकतात. ‘कुत्र्याचं काळीज’ तिच्या निसर्गत्वाच्या पुरस्कारासहित शंभर वर्षांपूर्वी जितकी प्रासंगिक होती, तितकीच ती आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम गर्भाधान नि इतर कृत्रिम गोष्टी यांच्या युगातही प्रासंगिक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e-    अलिक्सेय वर्लामव\u003cbr\u003e(समकालीन रशियन लेखक, समीक्षक आणि बुल्गाकवचे चरित्रकार.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eA satirical Soviet-era novella where a stray dog’s transformation into a human exposes the dark side of forced social engineering and ideological experiments.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":62607339683999,"sku":"1176","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1176-kutryachakalij3d.jpg?v=1764927095"},{"product_id":"urus-ani-itar-katha","title":"उरूस आणि इतर कथा | स्कैबाबा, अनु : डॉ. बेनझीर तांबोळी","description":"\u003cp\u003e\"(अधुरे - मुस्लीम कथालू या तेलगू कथासंग्रहाचा मराठी अनुवाद )\u003cbr\u003eमराठी मुस्लीम साहित्याचा एक क्षीण प्रवाह अस्तित्वात आहे. या प्रवाहाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही, असं निरीक्षण. स्कैबाबांच्या ‘मुस्लीमवादी तेलुगू साहित्या’चीदेखील दखल घेतली गेली नाही, अशी तक्रार आहे. या तक्रारी राहतीलच. त्याचं कारण प्रमुख प्रवाहातले ‘कथित घटक’ अन्य उपप्रवाहांकडे उपेक्षेने पाहतात, असं जाणकारांनी नोंदवलं आहे. दलित-ग्रामीण साहित्याचे प्रवाह मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्यासाठी वाट पाहावी लागलेली आहेत. पण जात-धर्माच्या पलीकडे माणूस आहे, त्याचं अस्तित्व आहे, त्याचं दुःख आणि त्याच्या वेदना अस्तित्वात आहेत, या वास्तवाकडे करुणाप्रेरित दृष्टीने पाहण्याची गरज असते. स्कैबाबांकडे ही करुणादृष्टी आहे, म्हणून त्यांना सामान्य माणूस ‘शोधावा’सा वाटतो.   \u003cbr\u003e- भारत सासणे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eया कथा ग्रामीण आणि लहान शहरांतील भारतीय मुस्लीम समाजाचे जीवन वास्तव दाखवतात, आणि अशा कथा यापूर्वी कुठे वाचायला मिळाल्या नाहीत, असे अनेकांनी नमूद केले आहे.  मुस्लीम समस्या आणि संस्कृतीचा स्पर्श कथांमध्ये असल्यानं त्यांचे वेगळे महत्त्व आहे. \u003cbr\u003e- शेख यूसुफ बाबा उर्फ स्कैबाबा\"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":62777519866015,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1187-uruscoverdesignfinal-front.jpg?v=1776768465"},{"product_id":"the-time-machine","title":"द टाइम मशीन | The Time Machine | H. G. Wells, Trans. Sanket lad | एच जी वेल्स, अनु. संकेत लाड","description":"\u003cp\u003e\"ब्रिटिश लेखक ‘एच. जी. वेल्स’ हे विज्ञानकथांचे जनक! ‘ द टाइम मशीन’ ही टाइम ट्रॅव्हलिंगची कल्पना मांडणारी पहिली कादंबरी. भविष्यकाळातून प्रवास करून वर्तमानात आलेल्या या वैज्ञानिकाला काय दिसलं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"\"मानवजात उत्तम घरांमध्ये राहत असल्याचं, सुंदर कपडे परिधान करत असल्याचं मी पाहिलं आणि तरीही ती कठोर परिश्रम करत असल्याचं मला आढळलं नाही. संघर्षाची कोणतीच लक्षणं नव्हती... ना सामाजिक, ना आर्थिक... दुकानं, जाहिराती, रहदारी या आपल्या जगाचा मुख्य भाग असणार्या सर्व गोष्टी नाहीशा झाल्या होत्या.” \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंघर्ष कमी करत नेणं, निसर्गावर विजय मिळवत जाणं, हे माणूस आदिम काळापासून करत आला आहे. पण ‘संघर्ष संपणं’ हा माणसाचं अस्तित्व संपण्याचा इशारा आहे. \u003cbr\u003eविजय मिळवणं नव्हे, तर एकमेकांसोबत आणि निसर्गाशी समांतर चालत राहणं हाच ‘माणूस’ नावाच्या जमातीचा अखेरचा बचाव आहे. वेल्स कदाचित हेच सुचवू पाहत आहेत...\u003cbr\u003eरोमांच, कल्पनाशक्ती आणि तत्त्वचिंतन यांचा संगम असलेली ही कादंबरी विज्ञानकथेच्या इतिहासातला एक मैलाचा दगड मानली जाते. काळ, प्रगती आणि मानवी समाजाच्या भवितव्याबद्दल विचार करायला लावणारी ‘द टाइम मशीन’ ही प्रत्येक वाचकाने अनुभवावी अशी अविस्मरणीय सफर आहे.\u003cbr\u003eExplore time travel, human evolution, and the fate of civilization in The Time Machine — a groundbreaking sci-fi classic by H. G. Wells that inspired generations of futuristic fiction.\"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":62796076843167,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1185-time-machine-3d.jpg?v=1779262318"}],"url":"https:\/\/dpbooks.in\/collections\/anuvaadit-kthaa-kaadnbrii.oembed?page=6","provider":"Diamond Publications Pune","version":"1.0","type":"link"}