{"title":"वैचारिक","description":null,"products":[{"product_id":"sapiens-marathi-edition","title":"सेपियन्स - मानव जातीचा अनोखा इतिहास","description":"\u003cdiv id=\"description\" class=\"tab-pane fade in active\"\u003e\n\u003cp\u003e१ लाख वर्षांपूर्वी मानवाच्या कमीत कमी ६ उपजाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे. आपण. होमो सेपिअन्स. आपण पृथ्वीवर आपली अधिसत्ता कशी स्थापन केली? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरे आणि राज्यांची कशी स्थापन केली? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसे काय विश्वास ठेवू लागलो? आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपले जग कसे असेल? मानवाची विचारपद्धती, वर्तन, बलस्थाने आणि मानवाचे भविष्य याबद्दलच्या आपल्या सर्व समजुतींना आव्हान देणारं एक विचारप्रवर्तक पुस्तक...सेपिअन्स.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36267588288671,"sku":"917","price":500.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/917.jpg?v=1600507367"},{"product_id":"muslim-rajkiya-vicharwant-ani-rashtravad","title":"मुस्लीम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद","description":"\u003cp\u003eभारतीय राष्ट्रवादाच्या विचारपरंपरेत मुस्लीम विचारवंतांचे मोठे योगदान आहे. परंतु, पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनामुळे फुटीरवादी राजकारण करणारे मौलाना महंमद अली, शौकत अली, बॅरिस्टर जिना आणि मोहम्मद इकबाल हेच तेवढे मुस्लीम नेते होते असा समज पसरत गेला, तो आजतागायत ! वास्तविक विभाजनवादी विचारांना छेद देऊन भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे कैक लहानमोठे मुस्लीम नेते होऊन गेले. या मुस्लीम विचारवंतांनी समकालीन फुटीरवादी मुस्लीम नेत्यांचा वेळोवेळी समाचारही घेतला आहे. सर सय्यद अहमद यांच्या समकालीन असणारे तुफेल अहंमद मंगलोरी यांनी सर सय्यद यांच्या फुटीर राजकारणावर प्रकाश टाकून धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता. मौलाना हुसैन अहमद मदनी हे भारताच्या संमिश्र राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी पवित्र कुरआनच्या आधारे संमिश्र राष्ट्रवादाची मांडणी केली होती. मौलाना हसरत मोहानी हे जसे गझलकार म्हणून प्रसिद्ध तसे ते राष्ट्रवादाचे प्रखर समर्थकही होते. लोकमान्य टिळकांचे ते अनुयायी होते. मोहानी यांनीच  प्रथम पूर्ण स्वराज्याचा सिद्धान्त मांडला. तर डॉ. रफिक झकेरीया यांनी बॅरिस्टर जिना यांच्या फुटीरतेवर चर्चा करणारे पुस्तकच लिहिले आहे. अशा या भारतीय मुस्लीम विचारवंतांची आणि त्यांच्या वैचारिक भूमिकेची प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी निष्पक्षपणे मांडणी केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया पुस्तकात राष्ट्रवादाचा पुरस्कार करणार्या भारतीय मुस्लीम विचारवंतांविषयी वाचणे रोचक तर आहेच शिवाय त्यांच्याविषयी अधिक कुतूहल जागवणारे आहे, हे निश्चित ! \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36453603049631,"sku":"926","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/926f.jpg?v=1601463992"},{"product_id":"balshikshan-swaroop-aani-navi-disha","title":"बालशिक्षण : स्वरुप व नवी दिशा","description":"\u003cp\u003eमज्जामानसशास्त्रातील घडणार्‍या घटनांकडे जागरूकतेने पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती अशी की, आता लहान मुलाकडे, शिकत असलेल्या शाळकरी मुलाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली आहे. एवढेच नव्हे तर या नव्या दृष्टीतून न्याहाळलेले बालकही आता वेगळे दिसू लागले आहे. आता घरी वा शाळेत आपल्यासमोर उभे राहणारे मूल, हे या सर्व शोधांच्या आधारावर आपण समजून घेतलेले बालक म्हणून आपल्यासमोर उभे राहणार आहे. आपण आजवर मानत आलो तसे अज्ञानाने गृहित धरलेले ते बालक नाही. तर आपल्या अतर्ंगत शक्तींच्या नि आपल्या आजूबाजूच्या आजवरच्या उभ्या राहिलेल्या संस्कृतीच्या आधारे, स्वतःच जगाची ओळख करून घेणारे असे ते मूल आहे. जगातील विविध वस्तू, नि घटनांचे आपल्या पद्धतींनी अर्थ लावणारे, नि त्याचे स्वतःपुरते स्वतंत्र सिद्धान्त बांधणारे असे ते बालक आहे. ते ज्ञाननिर्मिती करणारे शास्त्रज्ञही आहे नि ते तेवढेच प्रभावी असे निर्मितीक्षम कलावंतही आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36518494437535,"sku":"37","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/37f.jpg?v=1601895279"},{"product_id":"nayi-taalim","title":"नयी तालीम","description":"\u003cp\u003eनयी तालीम शिक्षणाला हेतूपूर्ण अंग होते ते नवसमाजरचनेच्या निर्मितीचे शोषणविहीन आणि समतेवर नि न्याय्यतेवर आधारित असा खरा लोकशाही समाज गांधीजींना अभिप्रेत होता. उच्च-नीच भाव नसलेला, शहरे आणि खेडी यांमधील अंतर नाहीसे करणारा, बुद्धीचे काम आणि श्रमाचे काम यांमध्ये फारकत न करणारा, शिक्षित आणि अडाणी समाजात पडलेले अंतर भरून काढणारा, जन्मापेक्षा कर्मावर भर देण्याची मानसिकता असलेला, जेथे प्रत्येकाला आपल्या गरजेनुसार मिळते आहे, पण त्याचबरोबर, आपल्यासारख्या दुसर्‍याला जे मिळणार नाही ते आपलेही असणार नाही, अशी मानसिकता तयार झालेला आणि परस्परांमध्ये धर्मभेद, जातीभेद, भाषाभेद, वर्गभेद अशा समाज मोडणार्‍या वृत्तींच्या वर उठणारा नि बंधुभावाने परस्परव्यवहार साधणारा असा समाज अपेक्षित होता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e गांधीजींच्या मते, नयी तालीमचे शिक्षण हे आजच्या समाजाला या ध्येयाकडे पावले टाकायला लावणारे, शिक्षण असणार होते. गांधीजींनी म्हटले होते, की प्राथमिक शिक्षण प्रदान करण्याची योजना ही फार दूरवरचे परिणाम अनुस्युत असलेल्या अशा एका शांतिपूर्ण क्रांतीकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36529620549791,"sku":"105","price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/105f.jpg?v=1601969182"},{"product_id":"udyonmukh-bharteeya-samajateel-shikshan","title":"उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षण","description":"\u003cp\u003eभारतीय शिक्षण व्यवस्थेच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":36530005606559,"sku":"133","price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/133f.jpg?v=1601973367"},{"product_id":"bharatiya-rajyasanstha-ani-samajik-nyaya","title":"भारतीय राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय","description":"\u003cp\u003eस्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही युरोपच्या प्रबोधनातून जगासमोर आलेली आणि फ्रेंच राज्यक्रांतीने प्रत्यक्षात उतरवण्याचे आव्हान म्हणून स्वीकारलेली तीन मूलभूत मानवी मूल्ये मराठी विचारवंतांना कशी मार्गदर्शक ठरली हे पुस्तकात दाखवून दिले आहे. या राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय ह्यांचा जुळ्यांचा संबंध असतो हा मुद्दा विस्ताराने मांडला आहे सामाजिक न्यायावर चिंतन करून, त्याची वाढ आणि त्याचा पुरस्कार करणाऱ्या, तसंच अनेक मराठी अभ्यासकांना अजूनही अपरिचित असलेल्या, पण महत्त्वाच्या विचारवंतांचा आणि आपल्या विचारांना प्रत्यक्ष धोरणांतून अमलात आणणाऱ्या राज्यकर्त्यांचा परिचय हा ग्रंथ करून देतो व हे या ग्रंथाचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. याचबरोबर हा ग्रंथ सामाजिक शास्त्रांच्या सर्वसामान्य पाठ्यपुस्तकांतून वगळल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या चिंतकांचीदेखील ओळख करून देतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– डॉ. जयंत लेले. ----\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात पवारांनी १४ विचारवंतांचे विचार अभ्यासले आहेत. त्यातील रानडे, गोखले, तिळक आणि नेहरू यांचा भर लोकशाही राजवट स्थापन करून त्याद्वारे सामाजिक न्यायाची धोरणे अमलात आणण्याचा होता, तर महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, वि. रा. शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचा भर सामाजिक न्यायावर होता. अर्थात त्यांना पण भारतात राज्यसंस्था उभी करायची होती. पण ती ज्याच्या आधारावर उभी राहणार आहे, त्या नागरी समाजातील जातीवाद आणि अन्याय नष्ट करण्यासाठी त्यांनी अग्रक्रम दिलेला आपणास दिसतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– डॉ. अशोक चौसाळकर\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37253631770783,"sku":"987","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/987f.jpg?v=1607681409"},{"product_id":"sarvdarshi-dr-babasaheb-ambedkar","title":"सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर","description":"\u003cp\u003eभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हा एक प्रेरणा देणारा जीवनदायी किरणांचा अखंड स्त्रोत आहे. या प्रेरणास्त्रोतातून मिळणारी प्रेरणा जीवनाच्या प्रत्येक अंगास स्पर्श करून उल्हासित आणि उत्साहीत करते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये निराशेचे क्षण येतात, अशावेळी निराश न होता कार्यरत राहण्याचा दिलासा बाबासाहेबांच्या जीवनातून मिळतो. बाबासाहेबांची बुद्धिमत्ता ही स्तिमित करणारी आहे. मात्र डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांचे विचार हे हस्तीदंती मनोर्यातील नसून सर्वसामान्यांच्या उद्धाराचा ध्यास घेणारे आहेत. प्रज्ञा, शील आणि करुणा या त्रिसूत्रींचा जसा ते पुरस्कार करतात, तसेच समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या विचारांची सबळ पाठराखण ते करतात. भारत हे राष्ट्र म्हणून उदयास यावे, आणि ते चिरकाल टिकावे, यासाठी त्यांनी केलेली संविधान निर्मिती ही एक एकमेवद्वितीय अशीच आहे. शिक्षणविषयक त्यांचे विचार हे मूलगामी, परखड आणि दिशादर्शक असेच आहेत. सर्वसामान्यांचा आणि वंचित घटकांचा उद्धार हे त्यांचे ध्येय होते. वंचित घटकांचा उद्धार हे त्यातील एक प्रयोग होता. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण, शिक्षण, स्वातंत्र्य आणि इतर विषयात त्यांनी केलेले अध्ययन, मनन आणि चिंतन यातून हा बोध होतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या सर्वदर्शी पैलूंचा वेध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथात केला आहे. डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. जनार्दन वाघमारे, श्री. ज. वि. पवार यासारख्या लेखकांनी दिलेल्या योगदानाने हा ग्रंथ समृद्ध झाला आहे. समाजकारण, राजकारण, लोकशाही, शिक्षण, अर्थकारण, धर्मकारण आणि संविधान अशा विविध विषयांवरील आशयपूर्ण लेख या ग्रंथामध्ये आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ग्रंथ रूपाने दिलेली ही आदरांजली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37424603791519,"sku":"840","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/840f.jpg?v=1609404319"},{"product_id":"manav-vijay","title":"मानव विजय","description":"\u003cp\u003eखरेच का त्या लोकांना ‘पुनर्जन्म’ नसून फक्त एकच जन्म आहे व फक्त भारतीय उगमाच्या धर्मांतील लोकांनाच जन्म, मृत्यू, व पुनर्जन्मांची साखळी अशी पुन्हा पुन्हा गर्भवासाची शिक्षा आहे? की स्वतः ईश्वराने वेगवेगळ्या ऋषी-प्रेषिताना मुद्दाम परस्परविरोधी माहिती देऊन मानवांमध्ये भांडणे, मारामार्‍या होण्याची व्यवस्था केली आहे? माझ्या अल्पमतीला असे वाटते की, आजच्या जगांतील सगळे धर्म व त्यांतील सगळे देव व ईश्वर, जे मानवजातीने स्वतःच निर्माण केलेले आहेत ते व त्यांचे आनंद, स्वर्ग, मोक्षांची सगळी ‘आश्वासने’ व त्यांच्या सगळ्या ‘धमक्या’ हे सर्व काही आपण विसरून जाऊ आणि ‘विज्ञान व मानवतावाद’ हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल. नाहीतर या धर्मांपासून व या ईश्वरांपासून मानवजातीची सुटका होणे फार कठीण आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":37425053532319,"sku":"869","price":156.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/869f.jpg?v=1609408244"},{"product_id":"jaramaran","title":"जरामरण : वृद्धत्व व मरण यांकडे पाहण्याचा सजग दृष्टिकोण","description":"‘म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण’ असे म्हटले जाते. म्हातारपणाची बालपणाशी केलेली तुलना योग्य असली तरी एका बाबतीत फरक जाणवतो. बाळाला दमदाटी केलेली चालते, बाळ ते विसरूनही जाते; पण, ज्येष्ठांना अशा प्रकारे कह्यात ठेवणे शक्य नसते. वृद्ध माणसे त्यांच्या कर्तृत्वावर जीवन जगतात. त्यामुळे दमबाजी सोडाच त्यांना काही सुचविणेही शक्य नसते. बाळ जसजसे वाढते, तसतसे ते अधिकाधिक स्वावलंबी होत जाते. त्याउलट, ज्येष्ठांचे वय जसे वाढते तसे त्यांचे शारीरिक आणि मानसिक परावलंबित्व वाढत जाते, याचे भान त्यांना रहात नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eवृद्धत्वाची सर्वांनाच धास्ती वाटते. अशा अटळ काळात आयुष्य कसे घालवावे याची आखणी विविध शक्यतांचा विचार करून योग्यप्रकारे केलेली बरी. याबाबत ‘जरामरण’ या पुस्तकात योग्य मार्गदर्शन आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘जरा’ म्हणजे म्हातारपण व त्यानंतर मृत्यूही अटळ. त्याबद्दलही पुस्तकात मोलाची माहिती आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘जरामरण’ या पुस्तकातून वृद्धांना किंबहुना सर्वांनाच योग्य मार्गदर्शन मिळेल.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":40701197025439,"sku":"995","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/995f.jpg?v=1627884697"},{"product_id":"kamgaar-sanghatana","title":"कामगार संघटना : काही निरीक्षणे","description":"\"एका बाजूला ज्यांच्यावरती आजही खूप अन्याय होत आहे अशा असंघटित कामगारांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांना संघटनेची गरजही प्रचंड आहे; पण त्याच वेळी या असंघटित समाजाला आपल्यात सामावून घेण्यात संघटित कामगार चळवळ अयशस्वी ठरली आहे; परिणामतः तिचे स्वतःचे अस्तित्वही आज धोक्यात आले आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eया परिस्थितीवर मात करून, कात टाकून पुन्हा एकदा कामगार चळवळीला ताठ कण्याने उभे राहायचे असेल; तर त्यासाठी तिला कठोर आत्मचिंतन करावे लागेल आणि त्यानंतर कुठल्यातरी एखाद्या व्यापक ध्येयाची कास तिला धरावी लागेल. एखादे व्यापक ध्येय समोर असेल; तर माणूस मरगळ झटकून पुन्हा उभा राहू शकतो, जोमाने वाटचाल सुरू करू शकतो. जे व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे; ते संस्थेच्या बाबतीतही खरे असावे.\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":41573453693087,"sku":"1001","price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/1001f.jpg?v=1638426895"},{"product_id":"hinsa-te-dahashatwad","title":"हिंसा ते दहशतवाद","description":"हिंसा ते दहशतवाद यांचा विचार केवळ हल्ले, अतिरेकी धर्म, राजकारण या टप्प्यांनी न् करता, मानवी मनोवृत्तींच्या ठेवणीचा प्रथम विचार केला पाहिजे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eजन्मजात आक्रमकतेला वाईट परिस्थितीची जोड मिळाली तर आक्रमक हिंसेत परिणत होते. ही निर्माण झालेली हिंसक मनोवृत्ती. हिंसा ही भावनाच मानसिक विकृतींमद्धे मोडते, तर विकृतीही सामाजिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक , धार्मिक आणि राजकीय अत्याचाराने जोपासली जाते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eत्यामुळे हिंसाचार कोणत्या मानसिकतेतून निर्माण होतो, हे कळले तर त्या मानसिकतेत कोणत्या मार्गाने बदल घडवणे शक्य आहे त्याचा निष्कर्ष काढता येईल. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या चिंतानाची बैठक देऊ करणारा हा विविध क्षेत्रातील तज्ञ , जाणकार व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":41713403986079,"sku":"317","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/317-HinsaTeDhshadvad-CTC.jpg?v=1641456371"},{"product_id":"dr-gail-omvedt-samajshastriya","title":"डॉ. गेल ऑम्व्हेट समाजशास्त्रीय आकलन","description":"प्रा.डॉ.गेल ऑम्व्हेट या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संशोधक विचारवंत होत्या.त्यांची वैचारिक बांधिलकी ही सिद्धांत आणि कृतिशीलता यांच्याशी होती. इटालियन विचारवंत ग्राम्सी यांना अभिप्रेत असलेला 'जैविक विचारवंत' हा त्यांच्या समाजशास्त्रीय संशोधनामध्ये आढळतो. डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतिकारक सांस्कृतिक विचारांना आंतरराष्ट्रीय अभ्यास विषयांमध्ये पहिल्यांदा आधिष्ठित केले. त्यांनी भारतातील जातवास्तवाचा प्रश्न हा समाजशास्त्रीय विचारविश्वात अग्रभागी आणला. स्त्री अभ्यासामध्ये वर्ग, जात, लिंगभाव आणि पर्यावरण यांच्यातील आंतरसंबंधांचा आलेख मांडला. त्याचबरोबर दलित स्त्रियांच्या अस्तित्वाची प्रारंभिक नोंद त्यांनी ठळक केली. डाव्या चळवळीतील चर्चाविश्व आणि कार्यक्रमपत्रिकेत फुले-आंबेडकरांचा क्रांतीदर्शी विचार उजागर करण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. भारतातील मार्क्सवादी विचार परंपरा आणि सिद्धांतनाचे फुले-आंबेडकरी परिप्रेक्षात विश्लेषण केले तरच समृद्ध होऊ शकेल हा त्यांचा आग्रह आहे .बुद्धाचा धम्मविचार आणि तुकोबांचा भक्तीविचार यांचा चिकित्सक अभ्यास हा भारतीय तत्वज्ञानाची मूलगामी ओळख करून देणारा आहे. भारतातील नव्या सामाजिक चळवळी’नी क्रांतीची पुनर्व्याख्या व्यापक केली असे त्यांचे मत आहे .दलित बहुजन विचारवंतानी आणि नेत्यांनी रविदासाचा बेगुमपुरा ,फुलेंचे बळीराज्य,पेरीयारांचे द्रविडस्थान, शाक्य बौद्ध धर्मीयांचे बौध्द राष्ट्रकुल आणि डॉ.आंबेडकरांचे प्रबुध्द भारत या भावचित्राला साकार करावे हे त्यांचे भविष्यदर्शी प्रतिपादन आहे . या ग्रंथामध्ये डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या बहुविध संशोधकीय आयामांच्या मूलग्राही चिकित्सक लेखांचा अंतर्भाव आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e डॉ.सुरेंद्र जोंधळे \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":42747692646559,"sku":"1037","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/1037f.jpg?v=1666938867"},{"product_id":"dr-gail-omvedt-samjun-ghetana","title":"डॉ. गेल ऑम्व्हेट समजून घेताना","description":"वैज्ञानिक दृष्टीकोन, समतेचे तत्त्वज्ञान, लोकशाहीनिष्ठा, बुद्धिप्रामाण्यवाद, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तन हे डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या साहित्याचे आणि विचार-व्यवहारमूल्यांचे केंद्र राहिले आहे. आज समाजात सांस्कृतिक दहशतवाद, जातीय अभिमान, अवास्तव धर्मभान आणि धर्मवादी सांप्रदायिकता हेच विश्वभान म्हणून अभिव्यक्त होण्याइतकी संकुचितता आलेली आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ. गेल ऑम्व्हेट परिवर्तनवादासाठी महत्त्वाच्या ठरतात. आज आभासी वास्तविकता, हायपर टेक्स्ट यांसारख्या संकल्पना आणि उत्तर आधुनिक दृष्टीकोनासारखे परिप्रेक्ष यांमुळे विशिष्ट तत्त्वज्ञानाशी बांधिलकी असण्याचे युग संपुष्टात आले आहे. त्यामुळे यथार्थ सामाजिक वास्तव आणि त्याच्या परिवर्तनाच्या दिशा स्पष्ट होताना दिसत नाहीत.\u003cbr\u003eडॉ. गेल ऑम्व्हेट यांनी ज्ञानाच्या साचलेपणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या समृद्ध लेखणीला बुद्ध-मार्क्स-फुले-आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या कर्तृत्वाची उजेडवाट लखलखीत झालेली आहे. समाजव्यवस्था, समाजवास्तव आणि शोषण यांबद्दलची त्यांची जाण फारच स्पष्ट होती. बदलत्या ‘ग्लोबल व्हिलेज’च्या काळात दलित-शोषित जीवनाची आणि पुरुषसत्ताक जातिव्यवस्थेची बदलती परिमाणे सुरुवातीपासूनच आपल्या साहित्यातून अधोरेखित करत त्यांनी जातिअंताचा विचार मांडला. याचाच वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे.\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":42747693007007,"sku":"1038","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/1038f.jpg?v=1666938917"},{"product_id":"shodh-chirantanacha","title":"शोध चिरंतनाचा","description":"स्वीस चित्रकार, शिल्पकार, कलाइतिहास तज्ज्ञ आणि भारतविद्येच्या केवळ शुष्क अभ्यासक नव्हे; तर भारताबद्दल अंतरात जिव्हाळा बाळगणाऱ्या ॲलिस बोनर यांचे हे चरित्र. अतिशय संपन्न घरात जन्मलेल्या ॲलिस सदैव नैसर्गिक, साध्या जीवन शैलीच्या आणि चिरंतनाच्या शोधात राहिल्या. भारताबद्दलच्या ओढीने त्या इथे आल्या. त्यांनी पर्यटकाच्या नजरेने भारत पाहिला नाही; तर भारताच्या आत्म्याचा धांडोळा घेतला. थोडी थोडकी नाही तर त्रेचाळीस वर्षे त्या वाराणसीत राहिल्या. रमल्या. भारतीय देवता, शिल्पाकृती आणि मंदिरे हे त्यांचे उत्कट आवडीचे विषय होते. मंदिर स्थापत्यकलेवर देखील त्यांनी लिखाण केले. देश-विदेशात भ्रमण करून भारतीय शिल्पकलेची बलस्थाने त्या आग्रहाने मांडत राहिल्या. १९७४ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्या म्हणतात की, \"\"सूक्ष्म, तरल, सारगर्भ संवेदनांचा, कलांचा केवढा अनमोल वारसा भारतीय लोकांच्या रक्तात वारसाहक्काने वाहतो आहे बरं. त्यांचं मूल्य भारतीय लोकांना कधी खऱ्या अर्थाने जाणवेल?\"\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअशा या विलक्षण विदुषीची चरित्रगाथा वाचकाला ही समृद्ध करेल अशी आशा वाटते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":42858163044511,"sku":"1042","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/products\/1042f.jpg?v=1671096105"},{"product_id":"bhagavadgeeta","title":"भगवदगीता : जीवन-व्यवस्थापनशास्त्र | Bhagavadgeeta jeevan vyavastpanshastra","description":"\u003cp\u003eभगवद्गीता, केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, ती मानवी जीवनाचे व्यवस्थापन करणारी एक शास्त्रशुद्ध प्रणाली आहे. गीता आपल्याला काठावर उभी राहून निव्वळ कोरडे तत्त्वज्ञान सांगत नाही. तर आपण सर्व समस्यांमधून, स्वतःला सावरून उत्तर शोधावं, ह्यासाठी मायेचा हात पुढे करते. ह्या दीपस्तंभाच्या उर्जादायी प्रकाशस्त्रोतामध्ये कुणीही यावं आणि आयुष्य उजळून टाकावं हे तिचं अंगभूत सामर्थ्य आहे.\u003cbr\u003eकाळानुरूप परिस्थिती बदलते. समाज रचना, परंपरा बदलत रहातात. पण माणसाची अमर्याद लालसा आणि त्या विरुद्ध उभी रहाणारी निस्पृहता यांच्यातील संघर्ष मात्र चिरंतन सुरूच रहातो. इथे गीता आपल्याला शाश्वत नितीमूल्यांकडे निर्देश करून सांगते की, केवळ सत्गुणांच्या अधिष्ठानावरच आपल्याला सुसंस्कृत आणि सभ्य जीवनाची अपेक्षा करता येते.\u003cbr\u003eव्यक्तीने धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चार पुरुषार्थांमध्ये, धर्माधिष्ठीत मर्यादांमध्ये राहूनच आणि कामाचा उपभोग घ्यावा आणि मोक्षाकडे वाटचाल करावी. ही संयमित मानसिकता निर्माण करण्यासाठीच गीतेेचं मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे. गीतेचा कटाक्ष केवळ व्यक्तिगत मोक्षप्राप्तीवर नसून, गीतेने मोक्षाची परिभाषा व्यापक केली आणि त्यामध्येच लोककल्याणार्थ, निष्काम कर्मयोगाचे सूत्र समाविष्ट केलं.\u003cbr\u003eगीतेचा मूळ गाभा आणि सर्व सिद्धांत विचारात घेऊन सदर पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. वाचकांना, संकल्पना समजून घ्यायला सोपं जावं म्हणून मी, जिथे जिथे शक्य असेल तिथे चार्टस्, सूत्र ह्या द्वारे सादरीकरण केलं आहे. \u003cbr\u003eवाचकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सदर पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.\u003cbr\u003eIn this book author Sandhya Sapre has used the timeless teachings of the Bhagavadgeeta to help the reader make positive changes in their lives and live a more content and fulfilled life. \u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45475371253919,"sku":"1083","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1083BhagavadgeetetunJeevanvyavasthapanshastra-cover-3d.jpg?v=1716790090"},{"product_id":"loksatta-agralekh-2","title":"लोकसत्ता अग्रलेख खंड २ (२०१७-२०२४) | Loksatta Agralekh | Girish Kuber","description":"\u003cp\u003eलोकसत्ता अग्रलेख खंड २ (२०१७ ते  २०२४)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतात्कालिकतेच्या पलीकडे...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराष्ट्रांच्या वा व्यक्तिसमूहांच्या आयुष्यातील दैनंदिन घटना-घडामोडींचा अन्वयार्थ लावतानाच तात्कालिकतेकडून सार्वकालिकत्वाकडे जाणे, हे अग्रलेखांचे कार्य.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकसत्ताचे अग्रलेख वाचकप्रिय ठरतात ते यामुळेच. सखोल विचार, परखड विवेचन आणि सौष्ठवपूर्ण भाषा यांबरोबरच ठोस भूमिका हे या अग्रलेखांचे वैशिष्ट्य. अशाच काही निवडक अग्रलेखांचे हे संकलन. समकालीन इतिहासाचे साधन म्हणून ते उपयुक्त ठरेलच; परंतु वाचकांना वैचारिक आनंदाचा पुनःप्रत्ययही देईल !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe book contains select editorials of Loksatta by Girish Kuber from the year 2017 to 2024. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":56543860195487,"sku":"1128","price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1128-LoksattaAgralekh-bhag2-3d.jpg?v=1738231356"},{"product_id":"social-movements-in-india","title":"भारतातील सामाजिक चळवळी | Social movements in India | घनश्याम शहा | Ghanshyam Shah","description":"\u003cp\u003eव्यक्तिगत  पातळीवर, संघटनेविना सुरू झालेले प्रयत्न हे सामाजिक सुधारणांचे प्राथमिक स्वरूप आहे. या प्रयत्नांना राजकीय विचारवंतांचा पाठिंबा मिळाला, तर सामाजिक बदल होण्यास सुरुवात होते. हे भारतात कित्येक शतकांपासून सुरू आहे. पण अलिकडेच या चळवळींचा सखोल अभ्यास करण्याची पद्धत सुरू झाली आहे.\u003cbr\u003e या संपूर्णपणे पुनरवलोकित व अद्ययावत मूळविचारी पुस्तकामध्ये भारतातील सामाजिक चळवळीचे नऊ प्रमुख प्रकारात वर्गीकरण केले आहे. यात चळवळीतले कार्यकर्ते व चळवळ कशासाठी या दोन निकषांचा वापर केला आहे. उदा. शेतकरी, टोळ्या, दलित, मागासवर्गीय, स्त्रिया, विद्यार्थी, मध्यमवर्गीय, कामगार, मानवी अधिकार, निसर्ग व पर्यावरण इ. मूळ मुद्दा, त्याबद्दलची मूलतत्त्वे त्या क्षेत्रात काम करणारी संघटना व त्यांचे नेतृत्व या सार्याचा अभ्यास या प्रत्येक प्रकरणात केला आहे.\u003cbr\u003e या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून प्रा. शाह यांनी त्या प्रत्येक प्रकरणाबाबतचे उपलब्ध साहित्य, लिखाण परखडपणे परीक्षण करून १८५७ ते आजतागायत या कालखंडातील चळवळींबाबत लिहिले आहे. यात त्यांनी संबंधित प्रकरणांचे सविस्तर विवेचन करून विविध अभ्यासकांनी त्याबाबत केलेल्या लिखाणाचे परिशीलन केले आहे. शेवटी भविष्यात कशा प्रकारचे संशोधन करावे याचेही विवेचन केले आहे.\u003cbr\u003e भारतीय सामाजिक चळवळीचे तर्कदृष्ट्या वर्गीकरण करताना या पुस्तकाची पुष्कळ मदत सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना होईल, तसेच राजकीय ऐतिहासिक व समाजशास्त्रीय चळवळीतील कार्यकर्त्यांना पण होईल. सामाजिक चळवळीतील अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":62439555661983,"sku":"1142","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0485\/0394\/7423\/files\/1142-BhartatilSamajikChalvaliNEW-fr.jpg?v=1754126479"}],"url":"https:\/\/dpbooks.in\/collections\/vaicaarik\/bhagavad-gita.oembed","provider":"Diamond Publications Pune","version":"1.0","type":"link"}