आधुनिक जग- नवीन आवृत्ती प्रकाशित

प्रा. म. न. उदगावकर, डॉ. गणेश राऊत व डॉ. भूषण फडतरे यांनी लिहिलेल्या  'आधुनिक जग - History of Modern World' या पुस्तकाची नवीन आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे.

आधुनिक जगाच्या इतिहासाला आदि आहे पान अंत नाही. एकविसाव्या शतकात छायाचित्रण, दूरदर्शन आणि विविध प्रसारमध्यमांनी जग आपल्या घरात आणलं आहे. क्षणोक्षणी इतिहास घडत आहे. तो अक्षरबद्ध करणे अधिक आव्हानात्मक होत चालले आहे. विविध संदर्भाच्या माध्यमातून आधुनिक जगाच्या इतिहासाकडे बघण्याचा झरोका म्हणजे हा ग्रंथ.