Submissions
डायमंड पब्लिकेशन्सतर्फे पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्यांनी पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव पुढे दिलेल्या सुचनांप्रमाणे पाठवावा. जेणेकरून संपादक आपला प्रस्ताव तपासून आपल्याला जलद निर्णय कळवू शकतील.
१. ३०० ते ५०० शब्दात थोडक्यात प्रस्तावित पुस्तकाची माहिती द्यावी.
२. सोबत लेखकाचा अल्प-परिचय जोडावा.
३. पुस्तकाचे नमूना प्रकरण परीक्षणार्थ जोडावे.
४. सर्व माहिती शक्यतो ईमेल ने पाठवावी. हस्तलिखित असल्यास हस्तलिखिताची मूळ प्रत न देता झेरॉक्स प्रत द्यावी. हस्तलिखित गहाळ होण्याची शक्यता असल्यामुळे ही काळजी अवश्य घ्यावी.
५. हस्तलिखित देण्याची व नेण्याची सर्व जबाबदारी लेखकाची राहील.
६. पुस्तक प्रस्ताव ईमेल द्वारे किंवा डायमंड पब्लिकेशन्सच्या कार्यालयात सादर करू शकता.