संवाद 'मायलेकी-बापलेकी' च्या निमित्ताने : डॉ. आशुतोष जावडेकर आणि राम जगताप

'मायलेकी-बापलेकी' ही डायमंडचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आणि त्याला वाचकांचा छान प्रतिसादही मिळत आहे. निव्वळ ‘मूल’ म्हणून आपल्या लेकीबद्दल बापाला आणि आईला काय वाटतं किंवा आईबाप आपल्या लेकीशी स्वतःला कसे जोडून घेतात, याचा मागोवा घेण्याच्या उद्देशातून ‘बापलेकी-मायलेकी’ हे पुस्तक साकार झालं आहे.

 ‘बापलेकी’ या नात्याआधी ‘मायलेकी’ हे नातं निर्माण होतं. किंबहुना त्यामुळेच ते अधिक जवळचं, संवादी आणि मोकळेपणाचं मानलं जातं. पण आता ‘बापलेकी’ या नात्यातलं अवघडलेपणही गळून पडलंय. तेही ‘मायलेकी’इतकंच जिव्हाळ्याचं झालंय.

याच अनुषंगाने प्रसिद्ध लेखक आशुतोष जावडेकर यांच्याशी पुस्तकाचे संपादक राम जगताप यांनी संवाद साधला आहे. अवश्य पहा.