स्वत:च्या प्रतिभेने जग बदलणरा किमयागार : थॉमस एडिसन

थॉमस एडिसन या अवलिया तंत्रज्ञाने आपल्या अचाट शोधांनी मानवी जगताचा कायापालट केला आणि तंत्रज्ञानाला मानवी आयुष्याच्या केंद्रस्थानी आणून बसवले. या किमयागाराचे आयुष्य जिद्द आणि चिकाटी दिलेल्या संघर्षाची जणू एक गाथाच आहे. खऱ्या अर्थाने उद्यमशील असलेल्या एडिसनने आपल्या ज्ञानाचे सार काही प्रेरणादायी सूक्तांमध्ये मांडून ठेवले आहे.

 

“तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुम्ही कसे आहात, यावरून तुमची पात्रता ठरते.”

 

“जर पालकांनी आपल्या मुलांना उत्साहाची देणगी दिली, तर त्यासारखी दुसरी संपत्ती नसेल.”

 

“कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तीन घटक गरजेचे असतात -  मेहनत, चिकाटी आणि व्यवहार ज्ञान.”

 

“संधीला योग्य तयारीची जोड मिळाली, तरच प्रगती होते, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे.”

 

“चिकाटी सोडून देणं हा आपला सगळ्यात मोठा दुबळेपणा असतो. यशस्वी होण्याचा निश्चित मार्ग म्हणजे, फक्त आणखी “एकदा प्रयत्न करणं.”

 

“जी गोष्ट विकली जाणार नाही, तिचा शोध मी कधीच लावणार नाही. विक्री हा उपयुक्ततेचा पुरावा असतो आणि उपयुक्तता हेच यश असतं.”

 

“अपयशाला कंटाळून लोक आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करणं सोडून देतात, तेव्हा ते यशाच्या किती जवळ असतात, याची त्यांना कल्पनाही नसते.”

 

“जगाला काय हवं आहे, याचा मी आधी शोध घेतो आणि जे हवं असेल, त्याचा मी शोध लावतो.”

 

“माझ्या कामाच्या खोलीत घड्याळ नव्हतं, म्हणूनच मी यश मिळवू शकलो.”

 

“चुकीचे निष्कर्ष मला हवेसे वाटतात; कारण बरोबर निष्कर्षांइतकेच ते माझ्यासाठी महत्त्वाचे असतात.”

 

“एखाद्या संकल्पनेचं मूल्य तिच्या वापरावर अवलंबून असतं.”

 

“आपल्या क्षमतेनुसार शक्य असलेल्या सर्व गोष्टी जर आपण केल्या, तर त्यांचा आवाका आपल्यालाही थक्क करणारा असेल.”

 

“मी अपयशी झालो नाही; हजारो निरुपयोगी मार्ग शोधून काढले.”

 

“बहुतेक लोक समोर आलेल्या संधीकडे दुर्लक्ष करतात, कारण संधीचं सोनं करण्यासाठी कष्ट करावे लागतात.”

 

“आपल्याकडे करण्यासारखं खूप काही आहे, पण त्यासाठी पुरेसा वेळ नाहीये, हे लक्षात आलं, तेव्हा त्या एकाच क्षणी मी निराश झालो होतो.”

 

“अलौकिक प्राज्ञेच्या मागे एक टक्के प्रेरणा आणि ९९ टक्के कष्ट असतात.”

 

थॉमस एडिसनचे कीर्ती परचुरे लिखित रंजक चरित्र वाचण्यासाठी क्लिक करा - 

Buy the Book थॉमस एडिसन