संशोधन हे बहुसंख्य संशोधक विद्यार्थ्यांना संशोधकांना व्यवस्थापनशास्त्रातील विद्यार्थ्यांना आणि तत्सम व्यक्तींना अतिशय उपयोगी पडणारे आणि महत्त्वाचे मानले जाते. या संशोधनक्षेत्रात आरंभ करणार्या संशोधकांच्या संशोधनविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने संशोधन पूर्ततेतील विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखकांनी या पुस्तकात केला आहे.
संशोधक विद्यार्थ्यांच्या सर्वच गरजा यातून भागणार आहेत. तसेच विविध विद्यापीठांनी संशोधनपद्धतीविषयी केलेल्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या विवेचनाचा या पुस्तकात समावेश केलेला आहे. यात प्रामुख्याने विविध संशोधन आराखडे आणि तंत्रे संशोधक विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी असा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आम्हा लेखकद्वयांना ‘अर्थशास्त्रीय संशोधनपद्धती’ हे पुस्तक संशोधक विद्यार्थ्यांच्या हाती देताना अतिशय आनंद होत आहे.