औद्योगिक अर्थशास्त्र
औद्योगिक अर्थशास्त्र
  • Load image into Gallery viewer, औद्योगिक अर्थशास्त्र
  • Load image into Gallery viewer, औद्योगिक अर्थशास्त्र

औद्योगिक अर्थशास्त्र

Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Rs. 250.00
Sold out
Unit price
per 

१८व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या प्रथम टप्प्यापासून, आज २१व्या शतकातील चौथ्या पिढीतील उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. २०व्या शतकातील संगणक प्रणाली आधारित उत्पादन पद्धती व स्वयंचलित यंत्रे यांद्वारे उत्पादनाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला. त्यापुढील चौथ्या पिढीतील औद्योगिक विकासाची दिशा म्हणजे, इंटरनेटवर आधारित माहिती व तंत्रज्ञान, मोबाईल व अॅप तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), रोबोटिक आणि ड्रोन तंत्रज्ञान हे होत. यांसारख्या तंत्रज्ञान विकासाने औद्योगिक विकासाचे एक नवे शिखर गाठले गेले आहे. या पार्श्‍वभूमीवर आज ‘औद्योगिक अर्थशास्त्र’ हा विषय स्वतंत्रपणाने अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे.
उद्योगांच्या विकासाच्या विविध अवस्था आणि त्यांतील महत्त्वाच्या संकल्पना यांचा अभ्यास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. यामध्ये औद्योगिक अर्थशास्त्राची ओळख, त्याची व्याप्ती, त्याचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व यांचे विवेचन केले आहे. तसेच उद्योगांच्या एकत्रीकरणाचा संदर्भही देण्यात आला आहे. उद्योगधंद्यांची स्थाननिश्चिती, त्यांवर परिणाम करणारे घटक, स्थाननिश्चितीचे सिद्धान्त यांचे विस्तृत विवेचन व विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे.
औद्योगिक वित्तपुरवठ्याचे विविध स्रोत, विदेशी भांडवलाची आवश्यकता व त्याचे विविध स्रोत अथवा प्रकार यांची सविस्तर रूपरेषा या पुस्तकात दिलेली आहे. भारतातील जलद औद्योगिक विकासासाठी वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या औद्योगिक धोरणांचा आढावाही या पुस्तकात घेण्यात आलेला आहे. तसेच भारतातील प्रमुख उद्योग व त्यांची प्रगती आणि त्यांच्या समस्या यांची चर्चा केलेली आहे. याचबरोबर जागतिकीकरण व अ-जागतिकीकरण; विशेष आर्थिक क्षेत्र, मेक-इन-इंडिया; सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (MSME), नवउद्योग (Start-up) यांसारख्या अद्ययावत संकल्पनांचा आणि धोरणांचा समावेशही या पुस्तकातील विवेचनामध्ये करण्यात आलेला आहे.
‘औद्योगिक अर्थशास्त्र’ व ‘औद्योगिक समाजशास्त्र’ या विषयांचा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व एमफिल, पीएचडी आणि प्रगत संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठीदेखील हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे.