ग्रामीण भागात महिलांच्या सक्रीय सहभागामुळे गावोगावी स्वयं-सहाय्यता बचत गटाची चळवळ जोमाने वाढत आहे. बचत गटामुळे बचत संकलनाच्या कामाला चालना मिळवून पतनिर्मितीद्वारे रोजगार निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. विशेषत ग्रामीण परिसरातील दारिद्र्य निर्मूलनात बचत गट हे विकासाचे साधन बनत आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाकडे महिलांचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता वाढत आहे. महिलांमधील अंगभूत असणार्या क्षमतांना आकार देण्यासाठी व स्वयंसहाय्यतेतून बचत गट अधिक मजबूत व्हावेत यासाठी ही पुस्तिका प्रबोधनात्मक ठरेल अशी अपेक्षा आहे.