"भूगोलाचा पर्यावरणाशी अत्यंत जवळचा संबंध आहे, कारण भूगोलात मानव आणि पर्यावरण यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास केला जातो. पर्यावरणात वेळोवेळी बदल होत असल्याने भूगोलातही या बदलांचा अभ्यास करावा लागतो. ‘पर्यावरण भूगोल’ या पुस्तकात पर्यावरणाचे विविध घटक, त्यांचा र्हास व व्यवस्थापन या सर्वांचाच विचार केलेला आहे. गेल्या तीन दशकांपूर्वी भूगोलात केवळ नैसर्गिक संपत्तीचे जागतिक वितरण याच्या अभ्यासावर भर होता, परंतु पयार्र्वरणावर होणार्या विघातक परिणामांची चर्चा करणे, आता अपरिहार्य झाले आहे व त्यामुळेच पर्यावरणीय भूगोल या विषयावार पुस्तक काढणे आवश्यक वाटले.
ग्लोबल वॉर्मिंग, ओझोनचा क्षय, घनकचर्याची समस्या, त्सुनामी लाटा, अपारंपारिक ऊर्जा, वायु, जल आणि ध्वनीप्रदूषण इ. विषय मांडले असल्यामुळे सदर पुस्तक प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानात भर घालणारे ठरले आहे.
हे पुस्तक शक्य तेवढ्या सहज आणि सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तसेच शक्य तिथे सांख्यिकी माहिती — आकृत्या, नकाशे इ. चा समावेश केलेला आहे. त्यामुळे हा विषय समजण्यास सोपा होईल.
पर्यावरणशास्त्र विषयची ओळख करून देणारे संदर्भ पुस्तक. भूगोल व पर्यावरणशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक "