Pruthvhijidnysa

पृथ्वीजिज्ञासा : पृथ्वीचे अंतरंग व बाह्यरंग उलगडणारा लेखसंग्रह !

Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Rs. 250.00
Sold out
Unit price
per 

आपल्या आकाशगंगेतील ग्रह आणि विश्वाच्या अफाट पसार्‍यातील इतर ग्रह आणि तारे या बद्दलचा अभ्यास दिवसेंदिवस वाढतो आहे. यातून प्रकर्षाने लक्षात येऊ लागलेली गोष्ट म्हणजे पृथ्वीची अद्वितीय लवचिकता.

साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. तेव्हापासून अनेक घडामोडींनी आणि क्रिया-प्रक्रियांनी पृथ्वीवर विविध भूरूपे, भूखंडे आणि समुद्र तयार झाले. अतिथंड हिमयुगे, मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टीचा नाश, सदैव बदलते हवामान अशा अनेकविध संकटांना टक्कर देत, पृथ्वी अजूनही भक्कमपणे टिकून आहे.

पृथ्वीचे क्लिष्ट, काहीसे अनाकलनीय आणि विलक्षण लवचीक स्वरूप समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक प्रयत्न केले आहेत. पृथ्वीचे संपूर्ण ज्ञान व्हावे यासाठी त्यांनी अनेक संकल्पना, सिद्धान्त मांडले. संशोधने केली.

या सर्व गोष्टींचा संक्षिप्तरूपात आढावा घेण्याचा हा प्रयत्न.