कुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी.
जुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही प्राचीन भारतीय वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत.
कथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या रंजक आणि उद्बोधक समन्वयामागचा हेतू हाच की मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.