"भारत हे महान अशा दुर्गपरंपरेचे राष्ट्र आहे. येथील मानवी समुदायाला स्वसंरक्षणाची जाणीव होताच दुर्गांच्या निर्मितीचा श्रीगणेशा झालेला निदर्शनास येतो. सिंधू संस्कृती ते भारताच्या स्वातंञ्य कालखंडापर्यंत प्रदिर्घ काळ भारतीय दुर्गाश्रयाने राहिले. भारतीयांचे सण-उत्सव, धर्म-परंपरा रूढी व चालिरीती दुर्गांच्या आश्रयाने अबाधित राहील्या. प्राचीन ते अर्वाचीन काळ शेकडो आक्रमक कायम लुटीसाठी येत गेले मात्र रामचंद्रपंत अमात्य म्हणतात, ""या देशी दुर्ग होते म्हणून अवसिष्ट राज्य राहिले"" छत्रपती शिवरायांनी दुर्गांच्या योगे स्वराज्य निर्मीले. दुर्ग हे भारतमातेचे खरे अलंकार आहेत. दुर्गनिहाय लेखन अनेकांगाने झाले असले तरी प्राथमिक व अप्रकाशित साहित्यासहीत संदर्भांनी संशोधन व अधिकांश लेखन अभिप्रेत आहे. विद्यावाचस्पतीच्या विषय निश्चिती समयी धांडोळा घेतांना दुर्ग विषयावर पुरेसे संशोधन नाही हे ध्यानी आले म्हणून ’दुर्गांची संस्कृती’ अशी विषय निवड केली. सदर ग्रंथ लेखनाचा मुळ उद्देश आहे की, प्रस्तुत ग्रंथ हाती आल्यावर सामान्य वाचक ते संशोधक सर्वांना भारतीय दुर्गसंस्कृती ध्यानी यावी. तसेच मानवी जीवनाचा दुर्गसहीत प्रवास व त्याचे टप्पे र्इतीश्री पावेतो समोर यावेत. सारांश दुर्गांचा श्रीगणेशा ते भारताचा दुर्गाश्रयाने स्वातंञ्यलढा या ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांना आकलन होणार आहे. जागतिक दृष्टिने स्थानिक दुर्गांचे महत्व यातून अधोरेखीत होत असून पर्यटन विकास व स्थानिक रोजगार वाढीस चालना मिळेल तसेच दुर्गांची सध्यस्थिती व उपाययोजना याची मांडणी असल्याने वाचकांच्या पसंतीस प्रस्तुत ग्रंथ असेल
डॉ.प्रमोद सोमनाथ बोराडे
"
डॉ.प्रमोद सोमनाथ बोराडे
"