प्रस्तुत स्पष्टीकरणात्मक कोश म्हणजे एक संक्षिप्त ज्ञानकोशच आहे. या कोशामध्ये प्रथम इंग्रजी संज्ञा घेऊन त्यांना मराठी प्रतिसंज्ञा दिलेल्या आहेत. नंतर त्या संज्ञा-सिध्दांताचे मराठी भाषेत स्पस्टीकरण दिले आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतील ग्रंथ वाचत असताना अर्थाविषयी येणार्या अडचणी दूर होणार आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येक विषयाच्या कोशाच्या शेवटी मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दावली दिलेली असल्याने मराठी भाषेतील ग्रंथ वाचकांचीही सोय झालेली आहे. आज मराठी भाषेत एकतर प्रदीर्घ स्वरूपातील ज्ञानकोश आहेत किंवा केवळ मराठी प्रतिशब्द देणारे शब्दकोश आहेत. परंतु मराठी प्रतिशब्दासह मराठीमध्ये संक्षिप्त स्वरूपात स्पष्टीकरण देणारे कोश उपलब्ध नाहीत. ॠामाजिक शास्त्रांच्या बाबतीत ही गरज या कोशामुळे भागणार आहे. प्रस्तुत कोशाचे सर्वच भाग ज्ञानेच्छू अशा सर्व ज्ञानशाखामधील जिज्ञासूंना उपयुक्त ठरतील असा विश्वास वाटतो.