शासकीय कामकाजात आता मराठीचा वापर करण्याचं धोरण आहे. त्या धोरणाला पूरक असे विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांसाठीचे कोश आजवर प्रकाशित झाले; पण संगणक क्षेत्रासाठी असा कोश आढळत नाही.
सध्या संगणकक्षेत्रात मराठीचा वापर करताना मराठी प्रतिशब्द माहीत नाहीत म्हणून इंग्रजी शब्द मराठीत लिहून वेळ मारून नेली जाते. या कोशामुळे आता अशी वेळ येणार नाही.
इंग्रजी भाषेतलं संगणक क्षेत्रातलं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून मिळायला मदत व्हावी, मराठीचा वापर संगणकासह सर्व क्षेत्रांत वाढावा हा या कोशाचा उद्देश आहे.
साधारण ७००० शब्द.
मराठी - इंग्रजी आणि इंग्रजी - मराठी दोन्ही पद्धतींनी मांडणी.
सर्व विद्यार्थीवर्गाला आणि संगणक वापरणार्या प्रत्येकाला उपयुक्त.