जरामरण : वृद्धत्व व मरण यांकडे पाहण्याचा सजग दृष्टिकोण
जरामरण : वृद्धत्व व मरण यांकडे पाहण्याचा सजग दृष्टिकोण
  • Load image into Gallery viewer, जरामरण : वृद्धत्व व मरण यांकडे पाहण्याचा सजग दृष्टिकोण
  • Load image into Gallery viewer, जरामरण : वृद्धत्व व मरण यांकडे पाहण्याचा सजग दृष्टिकोण

जरामरण : वृद्धत्व व मरण यांकडे पाहण्याचा सजग दृष्टिकोण

Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Rs. 125.00
Sold out
Unit price
per 

‘म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण’ असे म्हटले जाते. म्हातारपणाची बालपणाशी केलेली तुलना योग्य असली तरी एका बाबतीत फरक जाणवतो. बाळाला दमदाटी केलेली चालते, बाळ ते विसरूनही जाते; पण, ज्येष्ठांना अशा प्रकारे कह्यात ठेवणे शक्य नसते. वृद्ध माणसे त्यांच्या कर्तृत्वावर जीवन जगतात. त्यामुळे दमबाजी सोडाच त्यांना काही सुचविणेही शक्य नसते. बाळ जसजसे वाढते, तसतसे ते अधिकाधिक स्वावलंबी होत जाते. त्याउलट, ज्येष्ठांचे वय जसे वाढते तसे त्यांचे शारीरिक आणि मानसिक परावलंबित्व वाढत जाते, याचे भान त्यांना रहात नाही.
वृद्धत्वाची सर्वांनाच धास्ती वाटते. अशा अटळ काळात आयुष्य कसे घालवावे याची आखणी विविध शक्यतांचा विचार करून योग्यप्रकारे केलेली बरी. याबाबत ‘जरामरण’ या पुस्तकात योग्य मार्गदर्शन आहे.
‘जरा’ म्हणजे म्हातारपण व त्यानंतर मृत्यूही अटळ. त्याबद्दलही पुस्तकात मोलाची माहिती आहे.
‘जरामरण’ या पुस्तकातून वृद्धांना किंबहुना सर्वांनाच योग्य मार्गदर्शन मिळेल.