Maharashtrache Shasan va Rajkaran
Maharashtrache Shasan va Rajkaran
  • Load image into Gallery viewer, Maharashtrache Shasan va Rajkaran
  • Load image into Gallery viewer, Maharashtrache Shasan va Rajkaran

महाराष्ट्राचे शासन व राजकारण

Regular price
Rs. 340.00
Sale price
Rs. 340.00
Regular price
Rs. 450.00
Sold out
Unit price
per 

 महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेध घेणारा हा गेल्या केवळ ५० वर्षांतील घटनाक्रम सांगणारा, मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीची माहिती देणारा, निवडणुकींचे विश्लेषण करणारा किंवा राजकीय पक्षांच्या आजवरच्या प्रवासाचा मागोवा घेणारा ग्रंथ नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणार्‍या राष्ट्रीय घडामोडी, बदलते अर्थकारण, विविध जनआंदोलनांतून उभे राहिलेले कळीचे प्रश्न यांचाही वेध या ग्रंथात घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रवास कॉंग्रेसवर्चस्वाकडून बहुपक्षीय आघाड्यांकडे कसा झाला आणि महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या वेळी प्रमुख असणारे विरोधी पक्ष नगण्य बनून, शिवसेना-भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष सत्तेवर कसे आले, याची चर्चाही इथे केली आहे. या ५० वर्षांतील राजकारणाचा समग्रपणे वेध घेण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.