न्याय, व्याकरण, ज्योतिष, ऋग्वेद आणि यजुर्वेद यांचे सांगलीच्या पाठशाळेत शिक्षण झाल्यावर नक्षत्रांच्या भविष्यवेधापेक्षा नभोमंडलातील त्यांचे स्थान तसेच त्यांचे लोकमानसातील स्थान यांच्याकडे पं. महादेवशास्त्री जोशी यांचे लक्ष वेधले गेले आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी नक्षत्रलोकाचा हा प्रवास वाचकांना घडवून आणला आहे.