सध्या अग्रेसर असणारे दोन आजार, हृदयविकार आणि मनोविकार-नैराश्य. दोघांच्या मुळाशी एकच तत्त्व ‘मानसिक ताण!’
त्यात मानसिक आजाराभोवती अज्ञान, गैरसमज आणि सामाजिक कलंक यासारख्या कल्पनांची भीती, त्यावर असणारे, अंधश्रद्धेचे सावट आणि शरीरासारखी सुदृढ मनासाठी काळजी न घेण्याची वृत्ती. या पार्श्वभूमीवर माधवी कुंटे यांचे हे पुस्तक सर्वांना निरामय आनंदी जगण्याची ओळख देते, तर मनोरुग्णांना आपल्या आजाराविरुद्ध कलंकाची कोणतीही भीती व बाळगता उभे राहण्याचे बळ देणारे आहे.
साध्या सोप्या भाषेत मनोविकाराची ओळख, त्याची कारणे आणि त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी यांची मांडणी हा या पुस्तकाचा उद्देश. आपल्यातला असला तरी आपल्यापासून हा आजार दूर कसा ठेवावा, हे छोट्या-मोठ्या टिपस् आणि उदाहरणांसह सांगणे ही या पुस्तकाची खासियत.