आपला दृष्टिकोण म्हणजे आपली जगाकडे बघायची खिडकी आहे. ‘आपल्या स्वत:च्या या खिडकीतून आपल्याला जगाचे दर्शन हॉट असते.’ ही जॉर्ज बर्नाड शॉचे वाक्य किती बोलके आणि अर्थपूर्ण आहेत, नाही का? आपला जसा दृष्टिकोण असेल तसेच जग आपल्याला दिसते.
प्रेरक गोष्टींमध्ये आयुष्य उन्नत, सकारात्मक करण्याची क्षमता असते. त्या आपल्याला हसवतात, रडवतात, प्रोत्साहित करतात व प्रेरणा देतात. मला खात्री आहे, की या पुस्तकात आपल्याला अशा काही गोष्टी सापडतील, अशी काही माणसं भेटतील, जी माणसं आपल्याला बलवान बनवून आपल्यात सकारात्मक आणि समृद्ध जीवनाचा अंकुर रुजवतील अशी मला खात्री आहे.