भारताच्या हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासाच्या विविध पैलूमध्ये वर्तमान संदर्भात
लोकशाही शासन व्यवस्थेचा इतिहाससुद्धा फार प्राचीन आहे . या प्राचीन इतिहासाच्या
संदर्भात सखोल संशोधन करून लेखकाने आजपर्यंत अंधारात असलेल्या
माहितीला या पुस्तकाद्वारे उजाळा दिला आहे.
वैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, बौद्ध काळ , इंग्रज काळ आणि
स्वातंत्र्य प्राप्ती नंतरचा काळ या कालावधीत कोणकोणत्या प्रकारच्या जनकल्याणाच्या
परंपरा आणि प्रथा प्रचलित होत्या , इत्यादि बाबी बद्दल दुर्मिळ माहिती मनोरंजक
घटनांसह या पुस्तकात ग्रंथीत केल्या आहेत. या व्यातरिक्त जगातल्या अनेक देशामध्ये
'समकालीन लोकशाही व्यवस्था' अथवा अन्य शासन व्यवस्था च्या समवेशासह
हे पुस्तक भारतीय लोकशाही इतिहासावर लिहिलेला एक संपूर्ण ग्रंथ आहे.