सद्य:स्थितीत माहिती तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झालेला असून, पुढील काळातही तो वाढणार आहे. संगणक, मोबाईल, लॅपटॉप इत्यादींचा वापर मोठ्याप्रमाणात होत असताना, अतिरिक्त लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी नवकल्पनांचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरत आहे. सदर पुस्तकात डिजिटल साक्षरता, व्यावसायिक जीवनातील डिजिटल साक्षरतेची भूमिका, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, प्रवाह, संधी स्पष्ट करून सामाजिक नवकल्पना, सामाजिक समस्या, नागरीकृती इत्यादींचे सामाजिक जीवनातील महत्त्व लक्षात येते. सामाजिक उद्योजकता, व्यावसायिक उपक्रम, स्टार्टअप इत्यादी संकल्पनांची निर्मिती त्याचबरोबर नागरी शिक्षणात हक्क आणि कर्तव्ये, सामाजिक न्याय, सीमांत घटक, पंचायत राजची भूमिका स्पष्ट केली आहे. भारताची नवीन ओळख त्यामुळे स्पष्ट होते. सदर पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा, शासन इत्यादींसाठी उपयुक्त आहे.