"इतिहास हा केवळ भूतकाळातील घटनांचा संग्रह नसून मानवी समाजाच्या विकासाचा, परिवर्तनाचा आणि विचारप्रवाहाचा आरसा आहे. इतिहासाचा अभ्यास करताना घटनांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण, उपलब्ध साधनांचे चिकित्सक परीक्षण आणि सत्याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक असते. या सर्व प्रक्रियेला शास्त्रीय स्वरूप देणारे क्षेत्र म्हणजे इतिहास लेखनशास्त्र होय. इतिहास हा केवळ घटना, व्यक्ती किंवा राजवटींचे वर्णन नसून तो समाजाच्या विकासाचा, सांस्कृतिक परिवर्तनाचा आणि मानवी विचारप्रवाहाच्या उत्क्रांतीचा अभ्यास आहे. वर्तमान समजून घेण्यासाठी आणि भविष्याचा योग्य वेध घेण्यासाठी इतिहासाचे ज्ञान उपयुक्त ठरते. इतिहास लेखन हे एक शास्त्र असून त्यासाठी संशोधन, साधनांचे परीक्षण, विश्लेषण, अर्थनिर्वचन आणि सादरीकरण यांची योग्य जाण आवश्यक असते. प्रस्तुत इतिहास लेखनशास्त्र : लेखनतंत्र आणि नवे प्रवाह हे पुस्तक याच उद्देशाने लिहिण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या पुस्तकामध्ये इतिहासाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि प्रकार यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. इतिहासाच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या साहाय्यकारी शास्त्रांची माहिती देण्यात आली आहे. तसेच इतिहासाच्या विश्वसनीयतेचा आधार असलेल्या विविध ऐतिहासिक साधनांचा परिचय करून देण्यात आला आहे. प्राथमिक, दुय्यम, पुरातत्त्वीय आणि मौखिक साधनांचे स्वरूप, उपयोग आणि महत्त्व यांचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. इतिहासलेखन क्षेत्रात गेल्या काही दशकांत अनेक नवीन विचारप्रवाह उदयास आले आहेत. या नव्या दृष्टिकोनांनी इतिहासाच्या अभ्यासाला व्यापकता प्राप्त करून दिली आहे. या पुस्तकात या सर्व प्रवाहांचे सुसंगत विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रस्तुत पुस्तक पदवी, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी, संशोधक, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच इतिहास विषयात रुची असलेल्या सर्व वाचकांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे.
Historiography: Writing Techniques and New Trends is a practical and comprehensive introduction to the principles of historical writing and research. Covering historical methods, source criticism, primary and secondary sources, archaeological and oral evidence, and contemporary trends in historiography, this book provides readers with the essential tools for studying and interpreting history. Ideal for undergraduate and postgraduate students, researchers, educators, and candidates preparing for UPSC, MPSC, and UGC NET examinations, it is an invaluable reference for anyone interested in the theory and practice of historical research."

