कोआलाचे सोबती - ऑस्ट्रेलियातील पंचतंत्र
कोआलाचे सोबती - ऑस्ट्रेलियातील पंचतंत्र
  • Load image into Gallery viewer, कोआलाचे सोबती - ऑस्ट्रेलियातील पंचतंत्र
  • Load image into Gallery viewer, कोआलाचे सोबती - ऑस्ट्रेलियातील पंचतंत्र

कोआलाचे सोबती - ऑस्ट्रेलियातील पंचतंत्र

Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 60.00
Regular price
Rs. 60.00
Sold out
Unit price
per 

" भारत काय किंवा इतर देश काय, प्रत्येक ठिकाणच्या संस्कृतीचं, निसर्गाचं स्वत:चं असं खास वैशिष्टय असतं. या पुस्तकातल्या कथांमधले प्राणी-पक्षी ऑस्ट्रेलियाचं वेगळेपण दाखवतात. या कथांमध्ये भौगोलिक वेगळेपण असलं, तरी माणसाला शहाणं करणार्‍या सार्‍या कथांची जातकुळी मात्र एकच असते!
‘ऑस्ट्रेलियातलं पंचतंत्र’ म्हणून शोभतील अशा या प्राणीपक्षी-कथांवर कुणा एका लेखकाचा शिक्का नाही. ऑस्ट्रेलियातले मूळचे रहिवासी असलेल्या आदिवासींच्या संस्कृतीत या कथा वर्षानुवर्षं चालत आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातल्या आदिवासी संस्कृतीचं म्हणून एक वेगळंच विश्व आहे. या संस्कृतीतल्या प्राणी-पक्ष्यांच्या कथा विलक्षण आहेत. त्या तत्त्वचिंतनपर आहेत. म्हणूनच त्या मनात रेंगाळतात.
भारतीय संस्कृतीप्रमाणे समृद्ध असणार्‍या दुसर्‍या एका संस्कृतीचा परिचय मुलांना व्हावा, म्हणून या कथा पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या आहेत.
"