संत साहित्यातील तत्त्वज्ञान विषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याचा प्रगत अभ्यासासाठी दुहेरी दृष्टीने उपयुक्त होणार आहे. तात्विक संज्ञांपाठीमागील संकल्पना स्पष्ट करून घेण्याच्या दृष्टीने वाङमय अभ्यासकाला सदर कोश मार्गदर्शक होईल आणि संतसाहित्यातील अवतरणांच्या द्वारा तात्विक संज्ञांच्या उपयोजनांवर प्रकाश पडत असल्यामुळे भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासकांनाही सदर कोश उपयुक्त वाटेल. शिवाय जिज्ञासू भाविकांच्या श्रद्धेला डोळस करण्यासाठी हा संज्ञाकोश उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.