"माझी लाडकी ल्युसी,
मी तुझ्यासाठी ही गोष्ट लिहिली खरी, पण लिहायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की, मुली पुस्तकांपेक्षा वेगाने मोठ्या होतात. साहजिकच आता तू परीकथा वाचण्याइतपत लहान राहिलेली नाहीस आणि हे पुस्तक छापून येईपर्यंत तू आणखी मोठी झालेली असशील. पण एक दिवस, तू परीकथा परत एकदा वाचण्याइतकी मोठी होशील... उंचावरच्या शेल्फवरून तू हे पुस्तक खाली काढशील... त्यावरची धूळ झटकशील आणि वाचताना काय वाटलं, ते मला सांगशील. तोवर कदाचित काहीही न ऐकू येण्याइतपत मी बहिरा झालेलो असेन आणि तुझ्या शब्दांची समज-उमज पडण्यासाठी खूपच म्हातारा झालेलो असेन... पण तरीही... मी असेन.
तुझा प्रेमळ गॉडफादर
सी. एस. लुईस
जादूई जगाची रंजक सफर घडवणारी ही कादंबरी! ही फक्त मुलांसाठीची गोष्ट नाही. आपल्या सगळ्यांच्या आत खोल दडून बसलेल्या निरागसपणाची ही गोष्ट आहे. म्हणूनच तर गेल्या ६० वर्षांपासून ही कादंबरी मनात घर करून बसली आहे. ‘नार्निया’ मालिकेतलं हे पहिलं पुस्तक म्हणजे ‘खुल जा सिमसिम’च्या खजिन्याची चावीच जणू...
Step through the wardrobe and enter the magical land of Narnia, where an eternal winter has fallen under the spell of the White Witch. When four siblings—Peter, Susan, Edmund, and Lucy—discover this enchanted world, they become part of an epic struggle between good and evil. Guided by the majestic lion Aslan, they must find courage, loyalty, and faith to help free Narnia from darkness. Filled with unforgettable characters, thrilling adventures, and timeless lessons, The Lion, the Witch and the Wardrobe is a beloved fantasy classic that continues to captivate readers of all ages.
Marathi translation of the C S lewis classic The Lion, the witch and the wardrobe."



