पर्यावरण अभ्यास
पर्यावरण अभ्यास
  • Load image into Gallery viewer, पर्यावरण अभ्यास
  • Load image into Gallery viewer, पर्यावरण अभ्यास

पर्यावरण अभ्यास

Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 240.00
Regular price
Rs. 300.00
Sold out
Unit price
per 

जगामध्ये पर्यावरणाच्या अभ्यासाला फारच महत्त्व प्राप्त झालेले आहे. पर्यावरण हा शब्द अलीकडे सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द झालेला आहे. सध्या आर्थिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण या संज्ञा प्रचलित होत आहेत. प्रगतीसाठी व उच्च राहणीमानासाठी स्पर्धा चालू असताना स्पर्धेतून जगाचे व भावी काळाचेही पर्यावरण धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा नाश आणि प्रदूषण यामुळे मानवजात स्वत:च नाश ओढवून घेईल अशी भीती निर्माण झालेली आहे. साधनसंपदेचा प्रचंड वेगाने होणारा र्‍हास, लोकसंख्या विस्फोट, आम्लपर्जन्य, हवामानातील बदल, जंगल आणि प्राणी यांचा संहार, प्रदूषण,  औद्योगिकीकरण, ओझोन स्तर विद्ध्वंस या समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या जाणून घेण्यासाठी सदरील पुस्तकात पर्यावरणाची ओळख, परिसंस्था, नैसर्गिक साधनसंपदा, जैवविविधता व संवर्धन, क्षेत्रीय कार्य, वृक्ष संवर्धन, पर्यावरण प्रदूषण, पर्यावरण धोरणे, मानवसमुदाय व पर्यावरण यांचा अभ्यास सदरील पुस्तकात केलेला आहे. सदरील पुस्तक विद्यार्थी; पर्यावरण अभ्यासक, स्पर्धा परीक्षा इत्यादींना उपयुक्त आहे.