जे. आर. आर. टॉल्कीन यांच्या ‘स्वामी मुद्रिकांचा’ (The Lord of the Rings) या महाकादंबरीचा ‘राजाचे पुनरागमन’ हा तिसरा आणि अंतिम भाग आहे.
मुद्रिकेचे साथीदार वेगवेगळ्या मोहिमांमध्ये गुंतले आहेत. अॅरगॉर्न प्राचीन राजांचा वारस म्हणून पुढे आला आहे. रोहॅनच्या अश्वयोद्ध्यांच्या साथीने तो आयसेनगार्डच्या सैन्याशी लढाई करून हॉनबर्ग इथे विजय संपादित करतो. ऑर्क्सच्या ताब्यातून निसटून मेरी आणि पिपीन कॅनगॉर्नच्या जंगलात शिरतात आणि त्यांची एन्टसशी भेट होते. गॅन्डाल्फ चमत्कारिकरित्या परत येऊन दुष्ट जादूगार सारूमानचा पराभव करतो.
इकडे सॅम आणि फ्रोडो मुद्रिका नष्ट करण्यासाठी मॉर्डॉरच्या दिशेने वाट काढत आहेत. आता स्मिगल उर्फ गॉल्लम त्यांच्या सोबतीला आहे. अजूनही तो त्याच्या ‘अनमोल सोनुली’मागे वेडापिसा आहे. शीलॉब या महाकाय कोळ्याशी झुंज दिल्यानंतर सॅम त्याच्या मालकाला मृत समजून सोडून देतो, पण फ्रोडो जिवंत आहे आणि तो ऑर्क्सच्या ताब्यात सापडलाय. इकडे कृष्णशक्तीच्या स्वामीच्या फौजा गोळा झाल्या आहेत.
Marathi translation of The Return of the King by J R R Tolkien. Translated in Marathi by Mughda Karnik.