तात्कालिकतेच्या पलीकडे...
राष्ट्रांच्या वा व्यक्तिसमूहांच्या आयुष्यातील दैनंदिन घटना-घडामोडींचा अन्वयार्थ लावतानाच तात्कालिकतेकडून सार्वकालिकत्वाकडे जाणे, हे अग्रलेखांचे कार्य.
लोकसत्ताचे अग्रलेख वाचकप्रिय ठरतात ते यामुळेच. सखोल विचार, परखड विवेचन आणि सौष्ठवपूर्ण भाषा यांबरोबरच ठोस भूमिका हे या अग्रलेखांचे वैशिष्ट्य. अशाच काही निवडक अग्रलेखांचे हे संकलन. समकालीन इतिहासाचे साधन म्हणून ते उपयुक्त ठरेलच; परंतु वाचकांना वैचारिक आनंदाचा पुनःप्रत्ययही देईल !