चेकमेट : निवडणूक जिंकूनही भाजपने महाराष्ट्रातील सत्ता का गमावली ?

चेकमेट : निवडणूक जिंकूनही भाजपने महाराष्ट्रातील सत्ता का गमावली ?

Regular price
Rs. 275.00
Sale price
Rs. 275.00
Regular price
Rs. 299.00
Sold out
Unit price
per 

**पूर्वनोंदणी सुरू 15 मार्च रोजी पुस्तक प्रकाशित होईल. **

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून ठेवणार्‍या एका प्रदीर्घ राजकीय नाट्याची या शपथविधीने अखेर झाली. कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात तोवर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. या सगळ्या काळात महाराष्ट्रातील जनता नव्या मुख्यमंत्र्यांची वाट पाहत असताना, बंद दाराआड घडत-बिघडत असलेल्या राजकीय सत्तासमीकरणांची रंजक आणि प्रसंगी थक्क करणारी सफर हे पुस्तक वाचकाला घडवते.

आजवर सर्वसामान्यांपुढे न आलेल्या गोष्टींची हकिकत आतील गोटातील स्रोतांकडून आणि खासगी संवादांच्या माध्यमातून सुधीर सूर्यवंशी यांनी वाचकांपुढे आणली आहे. तसेच या सर्व घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्नदेखील केला आहे.