२१ व्या शतकात दहशतवादाचा प्रसार जगाच्या सर्व भागात झालेला आहे, विशेषत: भारतीय उपखंडात आणि मध्यपूर्वेत, दहशतवादाने नंगानाच घातला आहे. हत्या, बॉम्ब-स्फोट, अपहरण, खंडणी हे शब्द आता सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत. श्रीलंकेच्या L.T.T. E. च्या दहशतवादी गटाकडे, स्व:ताचे नाविक दल आणि वैमानिक दल आहे. यांच्या पुढची पायरी अल कायदा या दहशतवादी गटाच्या हातात अण्वस्त्रे पडण्याची भीती आहे. हे सर्व समजून घेण्याकरिता आणि त्याविरुद्ध संघर्ष करण्याकरिता प्रत्येकाने हा ग्रंथ वाचून ही प्रवृत्ती, राक्षसी विचारधारा, विकृती समजून घेतली पाहिजे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्या विरुद्ध लढा उभारला पाहिजे.