९/११ने जागतिक राजकारणाची दिशाच बदलली. अनेक जुनी समीकरणे मोडली, नवीन तयार झाली. आजवर अमेरिका-भारतात ङ्गारसे सख्य नव्हते, ते आज मैत्रीच्या आणाभाका घेत आहेत. पाकिस्तानची तळी उचलणारी अमेरिका आज जातायेता त्याला ङ्गटकारतेय. आजवर चीनशी जुळवून घेणारी अमेरिका आता चीनच्या विरोधात आशियाई देशांची मोट बांधायचा प्रयत्न करतेय. भारतही जागतिक राजकारणात मोठ्या प्रमाणावर सक्रिय होऊन विविध करारांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका वठवायचा प्रयत्न करतोय. त्याचा परिणाम भारताच्या अन्य देशांशी असलेल्या समीकरणांवर होतोय.
एकीकडे अमेरिका-भारत-जपान-ऑस्ट्रेलिया असा चौकोन तयार होत असतानाच आशियात चीन-पाकिस्तान-रशिया असा नवा त्रिकोण तयार झालाय. हिंदी महासागराला जागतिक व्यापार आणि भूधोरणात्मक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. त्याच वेळी श्रीलंका, म्यानमार, मालदीव्ज, नेपाळ यांसारखे देश चीनकडे झुकत चालल्यामुळे भारतासोबत त्यांची ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ अधिक तीव्र होत चालली आहे.
या सगळ्या बदलांचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.