वेदिक कालापासून ते सुमारे इ. स. १२०० पर्यंतच्या भारतीय शिक्षण पद्धतीच्या स्वरूपाचे विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. बौद्ध, जैन व हिंदू धर्म व संस्कृति या एकाच वृक्षाच्या शाखा असल्यामुळे प्रस्तुत पुस्तकात बौद्धादि धर्मग्रंथात मिळणार्या माहितीचाही उपयोग करण्यात आलेला आहे. प्राचीन इतिहासाचा काल मुसलमानी अंमल प्रस्थापन होण्याच्या वेळी संपतो, असा सामन्यात: संकेत असल्यामुळे या विषयाचा इतिहास तेराव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत नेण्यात आला आहे. पुस्तक वाचून आपल्या शिक्षणपद्धतीत जे अनेक गुण होते, त्यांची वाचकांना योग्य कल्पना येईल.
नविन शैक्षणिक धोरणानुसार (छएझ) भारतीय ज्ञानप्रणाली (खपवळरप घपेुश्रशवसश डूीींशा) हा विषय सर्व ज्ञान शाखांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. भारतीय ज्ञानप्रणाली या विषयाच्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक निश्चितच उपयुत ठरेल असा विश्वास वाटतो. A book on Education in Ancient India by renowned Indologist and Historian Anant Altekar. Useful for the students Indian Knowledge System as per New Education Policy (NEP)