या विश्वातील सर्वात मोठे कोडे म्हणजे मानवाचा मेंदू होय.
भाषा, गणित, परिसराची जाण, स्मृती , विचार , ऊहापोह , निर्णय आणि कार्यवाही यांचा उगम मेंदूतच असतो.
श्वसन, रुधिराभिसरण आणि पचनक्रिया जीवनाला पायाभूत असतात. या क्रियांवर देखील मेंदूचेच नियंत्रण असते.
मनाचे कार्य म्हणजे मेंदूचे कार्य.
शरीरावर मनाच्या होणाऱ्या परिणामांमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, आणि पचनसंस्थेशी निगडीत असे अनेक आजार उद्भवतात.
मेंदूच्या कार्यातील सर्वात मोठे गूढ म्हणजे जाणीव.
आधुनिक मेंदूसंशोधनातून मेंदूच्या कार्याची जसजशी माहीती मिळत गेली, तसतसा या सर्व विषयांवर प्रकाश पडू लागला आहे. या संशोधनाचा आढावा घेण्याचे कठीण काम ‘कर्ता-करविता’ हे पुस्तक कर्ते. मराठी भाषेला अभिमान वाटावा इतक्या चांगल्या प्रकारे हे पुस्तक झाले आहे.
- डॉ. ह. वि. सरदेसाई