व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. त्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन खूप महत्वाचे आहे. हे तंत्र अत्यंत कुशलतेने हाताळणे गरजेचे असते.
स्पर्धेत भाग घेणारे संघ , त्यांचे खेळाडू , उपलब्ध वेळ, साधनसामग्री इत्यादीचा विचार व स्पर्धेच्या अनेक पद्धती यांची सांगड घालून स्पर्धा नियोजन यशस्वी करण्याच्या तंत्राचे भाग्यपत्रक बनवले जाते. क्रीडा स्पर्धा नियोजनाचे संपूर्ण तंत्र सहज सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे पुस्तक वाचकाच्या निश्चितच उपयोगी पडेल.