समाजशास्त्र या विषयाचा विचार करता ‘नेट व सेट’ परीक्षा देणार्या संबंधित प्राध्यापक व विद्यार्थी यांना उपयोगी पडावे म्हणून पेपर २ आणि पेपर ३ चे ‘अ’ व ‘ब’ विभाग यांचे एकत्रित संकलन असलेले व सुमारे १४२० प्रश्नांचा समावेश केलेले हे पहिलेच पुस्तक असावे असे वाटते.
या सर्व प्रश्नांचा पद्धतशीरपणे अभ्यास करून जर प्रश्न सोडविण्याचा स्व-प्रयत्न केला तर प्रश्न व त्याची उत्तरे स्मरणात राहणे सोपे जाईल असे वाटते.
विद्यापीठ अनुदान मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच पुस्तकातील प्रश्नांची रचना करण्यात आल्यामुळे परीक्षेत विचारल्या जाणार्या प्रश्नांचे स्वरूप संबंधितांच्या लक्षात येऊ शकेल.
संबंधित परीक्षार्थींच्या अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करेल ही अपेक्षा.