Ovi Gau Vidyanachi

ओवी गाऊ विज्ञानाची

Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 280.00
Regular price
Rs. 350.00
Sold out
Unit price
per 

‘ओवी गाऊ विज्ञानाची’ हा एक नावीन्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय म्हणता येईल असा प्रयोग आहे. विज्ञानातील माहिती आणि संकल्पना ओव्यांच्या स्वरूपात आणण्याची कल्पनाच आश्चर्यचकित करणारी आहे.

डॉ. पंडित विद्यासागर यांनी ती प्रत्यक्षात आणली आहे. ‘ओवी’ हा प्रकार मराठी माणसाच्या मनाशी जवळीक साधणारा आविष्कार आहे. ओवीची रचना, सोपी, साधी आणि सहज समजणारी असावी लागते. त्यात मुक्तछंद असला, तरी पहिल्या तीन ओळीत यमक साधावे लागते. यासाठी क्लिष्टता टाळून अचूकपणा राखणे आणि त्यासाठी समर्पक शब्द शोधणे ही तारेवरची कसरत आहे. डॉ. विद्यासागर यांनी ती सहजपणे साधली आहे.

या पुस्तकात समाविष्ट आशयाची व्याप्ती खूपच मोठी आहे. विज्ञानाशी संबंधित प्रमुख विषयांबरोबरच इतर विषयांचाही यात समावेश आहे. विशेष म्हणजे समाज आणि विज्ञान यांचा विचार परिणामकारकपणे केल्याचे यात दिसून येते.