असं म्हणतात की, ‘बोलणार्याचे दगडही विकले जातील, पण न बोलणार्याचे चणेसुद्धा विकले जाणार नाहीत.’ म्हणूनच, आजच्या या स्पर्धेच्या युगात उत्तम दर्जाचं संभाषण कौशल्य असणं अगदी आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व प्रभावशाली करण्यासाठी आणि संवादाच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल.
मुळातच माहितीचं आदानप्रदान योग्य रीतीने होऊन, त्यातून चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी ‘संवाद’ ही पहिली पायरी असते. एखाद्याशी अचूक संवाद साधणं, ही कौशल्यपूर्ण बाब आहे. हे कौशल्य कसं आत्मसात करायचं याचं सहजसोपं तंत्र या पुस्तकात सांगितलं आहे.
हे पुस्तक वेगवेगळ्या प्रकारच्या वाचकांसाठी आवश्यक मार्गदर्शन करेल. आपल्या करिअरला ‘बूस्ट’ देऊ इच्छिणारे सर्व स्तरांवरचे व्यवस्थापक, प्रसारमाध्यमांमधल्या व्यक्ती, उद्योजक आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. वैयक्तिक जडणघडणीबरोबरच व्यावसायिक जीवनात हमखास यश मिळविण्यासाठी ‘संवाद कौशल्य’ या पुस्तकाला पर्याय नाही!
- डॉ. आशा भागवत
हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -