वैज्ञानिक दृष्टीकोन, समतेचे तत्त्वज्ञान, लोकशाहीनिष्ठा, बुद्धिप्रामाण्यवाद, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तन हे डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या साहित्याचे आणि विचार-व्यवहारमूल्यांचे केंद्र राहिले आहे. आज समाजात सांस्कृतिक दहशतवाद, जातीय अभिमान, अवास्तव धर्मभान आणि धर्मवादी सांप्रदायिकता हेच विश्वभान म्हणून अभिव्यक्त होण्याइतकी संकुचितता आलेली आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ. गेल ऑम्व्हेट परिवर्तनवादासाठी महत्त्वाच्या ठरतात. आज आभासी वास्तविकता, हायपर टेक्स्ट यांसारख्या संकल्पना आणि उत्तर आधुनिक दृष्टीकोनासारखे परिप्रेक्ष यांमुळे विशिष्ट तत्त्वज्ञानाशी बांधिलकी असण्याचे युग संपुष्टात आले आहे. त्यामुळे यथार्थ सामाजिक वास्तव आणि त्याच्या परिवर्तनाच्या दिशा स्पष्ट होताना दिसत नाहीत.
डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी ज्ञानाच्या साचलेपणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या समृद्ध लेखणीला बुद्ध-मार्क्स-फुले-आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या कर्तृत्वाची उजेडवाट लखलखीत झालेली आहे. समाजव्यवस्था, समाजवास्तव आणि शोषण यांबद्दलची त्यांची जाण फारच स्पष्ट होती. बदलत्या ‘ग्लोबल व्हिलेज’च्या काळात दलित-शोषित जीवनाची आणि पुरुषसत्ताक जातिव्यवस्थेची बदलती परिमाणे सुरुवातीपासूनच आपल्या साहित्यातून अधोरेखित करत त्यांनी जातिअंताचा विचार मांडला. याचाच वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे.