आंतरराष्ट्रीय संबंध : महत्त्वाच्या संकल्पना या पुस्तकात ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयाची अभ्यासपूर्वक व संकल्पनात्मक मांडणी केली गेली असून आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रमुख संकल्पनांचे सविस्तर विवेचन या ठिकाणी केलेले आहे.
त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासातील विविध दृष्टिकोनांची सखोल चर्चा आणि जागतिकीकरणातील भारताची भूमिका यांविषयी महत्त्वपूर्ण मांडणी या पुस्तकातून अभ्यासता येईल.
‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयाची विस्तृत मांडणी करणारे हे पुस्तक म्हणजे पदवी व पदव्युत्तर वर्गांतील राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाबरोबरच संरक्षण व सामरिकशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी बहुमोल मार्गदर्शक ठरणारा असा संदर्भग्रंथ आहे.