एका प्रभावी संशोधनाच्या उपेक्षेची मनाला चटका लावणारी कथा!
संशोधनपूर्ण प्रबंधाच्या निष्कर्षांमधून त्या पानावर जे लिहीलं गेलं होतं ते अतिशय भयानक होतं. याच्याकडे दुर्लक्ष केलं तर असं काहीतरी भयंकर अघटित घडणार, याची पूर्ण कल्पना होती; पण काही काळ गेल्यावर मी ते विसरूनही गेलो होतो.
शेवटी ती घटना घडली आणि ते ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटा फुलला. हे अघटित घडणार, हे सांगण्यासाठी केवढा प्रयत्न केला होता मी? किती मार खाल्ला होता त्यासाठी? किती अपमान सहन केला होता?
काय झालं हे? कसं झालं? काय म्हणायचं याला? एक ‘अभिशाप’?
आपल्या विवेकीबुद्धीचा वापर करून विविध पातळ्यांवर समाजाभिमुख कार्यांमध्ये बरेचजण स्वत:ला झोकून देऊन, अहोरात्र झटत असतात. परंतु, भोवताली पसरलेल्या ‘सिस्टीम’च्या प्रभावामुळे, तसेच अधिकाधिक वाढत जाणार्या त्याच्या रेट्यामुळे ही सत्कार्ये दुर्लक्षिली जातात, त्यांची विविध पातळ्यांवर कोंडी होते, उपेक्षा केली जाते आणि विनाशाकडे वाटचाल सुरू राहते. अशाच दुष्टचक्रामध्ये सापडलेल्या आणि या ‘सिस्टीम’चाच एक बळी ठरलेल्या व्यक्तीची ही एक रोचक कथा वाचकांना नक्कीच खिळवून ठेवेल, विचार करायला लावेल.