आधुनिक समाजशास्त्रज्ञ
आधुनिक समाजशास्त्रज्ञ
आधुनिक समाजशास्त्रज्ञ
आधुनिक समाजशास्त्रज्ञ
  • Load image into Gallery viewer, आधुनिक समाजशास्त्रज्ञ
  • Load image into Gallery viewer, आधुनिक समाजशास्त्रज्ञ
  • Load image into Gallery viewer, आधुनिक समाजशास्त्रज्ञ
  • Load image into Gallery viewer, आधुनिक समाजशास्त्रज्ञ

आधुनिक समाजशास्त्रज्ञ

Regular price
Rs. 395.00
Sale price
Rs. 395.00
Regular price
Rs. 495.00
Sold out
Unit price
per 

"कोणत्याही शास्त्राचा विकास व प्रगतीमध्ये त्यांच्या संज्ञा, संकल्पना व सिद्धांत अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्याशिवाय त्या शास्त्राला समाजमान्यता मिळत नाही. त्याच न्यायाने समाजशास्त्रामध्ये अनेक अभ्यासक संशोधक व शास्त्रज्ञांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळेच भारतातही सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांमधून हा विषय शिकविला जातो व लाखो विद्यार्थी या पदव्या संपादन करत आहेत. त्यामुळे समाजशास्त्र विषयाच्या विकासाकरिता काम करणारे विचारवंत व शास्त्रज्ञ या दृष्टीनेही खूप महत्वाचे ठरतात.
आधुनिक समाजशास्त्रज्ञ या ग्रंथामध्ये जगातील अनेक समाजशास्त्रज्ञांचा उल्लेख केलेला आहे. ज्यांनी समाजशास्त्रीय संज्ञा, संकल्पना व सिद्धांत विकसित तर केलेल्या आहेच जोडीला अनेक नवनवीन दृष्टिकोनही मांडले आहेत. हा सर्व वैचारिक वारसा साध्या भाषेत वाचकांसमोर मांडण्याचा लेखकांनी प्रयत्न केला आहे.
या ग्रंथामध्ये विल्फ्रेडो पॅरेतो (१८४८-१९२३),थार्सटीन वेब्लेन (१८५७-१९२९), जॉर्ज सिमेल (१८५८-१९१८), चार्ल्स हार्टन कुले (१८६४-१९२९), लिओनार्ड टी. हॉबहाऊस (१८६४-१९२९), ब्रोनिसलॉ मैलिनोवस्की (१८८४-१९४२ ), पिटिरीम सोरोकीन (१८८९-१९६८), जी. सी. होमन्स ( १९१०-१९८९), व रॉल्फ डर्‍हेंडार्फ (१९२९-२००९) या नऊ समाजशास्त्रज्ञांचा समावेश केला आहेत. या सर्व शास्त्रज्ञांनी तत्कालीन समाज व्यवस्थेचा अभ्यास व संशोधन करून आपले मौलिक सिद्धांत प्रस्तुत केलेले आहेत. जे समाजशास्त्रात महत्त्वाचे मानले जातात. त्या समाजशास्त्रज्ञांची वैचारिकता लक्षात घेऊनच त्यांनी मांडलेल्या संज्ञा, संकल्पना, सिद्धांत व दृष्टिकोन यांची सरळ व सोप्या भाषेत मांडणी येथे केलेली आहे, जी सामान्य विद्यार्थी आणि इतर वाचक वर्ग यांना उपयोगी ठरणारी आहे. "

Marathi Language book on Modern Sociological Thinkers by Authors Dr. B M Karhade and Dr Kishor Raut.