साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांचे सुपुत्र, महान साक्षेपी इतिहाससंशोधक य. न. केळकर यांचे लेखन म्हणजे अस्सल सोनं आहे. गेली अनेक वर्षे हा दुर्मीळ खजिना जणू विस्मृतीच्या गुहेत गडप झाला होता. तो पुन्हा प्रकाशात येताच त्याचा मूळचा झळाळ डोळे दिपवून टाकतो. आजच्या पिढीला याचे दर्शन व्हावे यासाठीच हा प्रपंच. शिवपूर्वकालापासून मराठेशाहीच्या अंतापर्यंत एवढ्या विशाल कालपटावरून लेखक आपल्याला फिरवून आणतो. अनेक वस्तू, व्यक्ती आणि घटनांबद्दल मनोरंजक तरीही अस्सल माहिती पुरवतो. समृद्ध अनुभव देणारं हे साहित्य अभ्यासकांबरोबरच सर्वसामान्य वाचकानेही वाचावं असेच आहे. |