
भारतीय घटनेचे शिल्पकार, समाजिक न्यायाच्या लढ्याचे सेनानी, शोषित पीडित मानवतेचे उद्धारक अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे. या प्रतिमेच्या पुढे जाऊन भारतातील जातीव्यवस्थेचा अंत करण्यातून भारतीय राष्ट्र आर्थिक उन्नत अवस्थेत जाईल अशी भूमिका मांडणाऱ्या आंबेडकरांची जाती नष्ट करण्या मागची विचारसरणी काय होती, याची सर्वांगाने चर्चा होणे आवश्यक आहे. ही करत असताना यासंदर्भात आजवर अशी मांडणी ज्यांनी केली आहे त्यांच्या भूमिकेचा परामर्श घेणे आवश्यक आहे. डॉक्टर आंबेडकरांची भूमिका पुरुषसत्ताकतेच्या चौकटीतच वावरते, ती अन्य जातींना वर्ज्य करणारी, कनिष्ठ जातींच्या जातीवादाची आहे, ती वर्गवादी आहे; ती वंशवादी आहे. अशाप्रकारे आंबेडकरवादाचे आकलन मांडणाऱ्या भूमिकांचा प्रतिवाद या पुस्तकात केला आहे.