"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने श्रेयांक आधारित NEP - २०२० पद्धत लागू केलेली आहे. ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ हा पेपर मेजर-कोअर सेमिस्टर - ५ (ECO 301 MJ) साठी ठेवलेला आहे. या विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ हे पुस्तक लिहिलेले आहे.
सदर पुस्तकात लेखी (Theory) साठी चार प्रकरणांचा समावेश केलेला आहे, तर प्रात्यक्षिकासाठी (Practicals) तीन प्रकरणांचा समावेश केलेला आहे. सदर पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा विचार केला आहे. आवश्यक तेथे तक्ते, अद्ययावत आकडेवारी, संकल्पना, इत्यादींचा वापर यथार्थपणे केलेला आहे. सदर पुस्तक स्पर्धा परीक्षा, नेट/सेट परीक्षा, तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांसाठी उपयुक्त आहे.
पहिल्या विभागात पहिल्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख, दुसर्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धान्त, तिसर्या प्रकरणात व्यापार धोरण आणि चवथ्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय व्यापार करार यांचे विश्लेषण केलेले आहे तर दुसर्या विभागात पहिल्या प्रकरणात भारताचा व्यवहारतोल दुसर्या प्रकरणात भारताच्या परकीय व्यापाराची दिशा तर तिसर्या प्रकरणात परकीय भांडवल आणि आर्थिक विकास यांचा समावेश केलेला आहे.
या पुस्तकाचे विद्यार्थी, प्राध्यापक व इतर अभ्यासक उत्स्फूर्त स्वागत करतील अशी आशा आहे.
Prepared according to the NEP 2020 Credit-Based Curriculum of Savitribai Phule Pune University for ECO 301 MJ (Major Core, Semester V), this book provides complete coverage of International Economics. It includes both theory and practical components, supported by updated statistics, tables, and concepts. Ideal for undergraduate students, teachers, NET/SET aspirants, competitive examinations, and learners across universities in Maharashtra."

