पुस्तकाविषयी थोडेसे....
आरोग्य आणि समाज हे पुस्तक आरोग्यक्षेत्रावरचे तसेच आरोग्यक्षेत्रातील सामाजिक संबंधांचे समाजशास्त्रीय विश्लेषण करणारे आहे. त्यामुळे हे पुस्तक पदवी व पदव्युत्तर अभ्यास करणारे विद्यार्थी, आरोग्याच्या जाणिवा असणारे वाचक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर यांना मार्गदर्शक ठरू शकेल.
आरोग्यासंबंधीच्या विविध संकल्पनांचे विश्लेषण करताना आहाराचे स्वरूप, सकस व निकस आहार, आरोग्य- संवर्धनात स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण व पर्यावरणप्रदूषण, व्यक्ती, समाज, समुदाय व सरकार यांची आरोग्यरक्षणातील भूमिका, ग्रामीण आरोग्यसेवा योजना यासंबंधीचे सविस्तर विवेचन या पुस्तकात आहे.
शिवाय अन्न व औषध भेसळ,त्याचे स्वरूप, त्यासंबंधीचे कायदे,अन्नातील भेसळीचे स्वरूप दर्शविणारा तक्ता, औषधांचा व बनावट औषधांचा व्यापार, यातील अपप्रवृत्ती, तसेच डॉक्टरी व्यवसायातील अपप्रवृत्ती, ग्राहकसंरक्षण कायदा यावरही या पुस्तकात प्रकाशझोत टाकला आहे.अन्नभेसळीचा तक्ता वाचकांना व विशेषत: गृहिणींना अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.
आरोग्यसंरक्षणात प्रसारमाध्यमांची भूमिका, आजारामुळे विकलांग झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन यावरही या पुस्तकात विवेचन केले आहे.