वाणिज्य-अर्थशास्त्र तसेच बँक व्यवहार यांच्याशी निगडित असणार्या अभ्यासकांना दैनंदिन वापरातील बँकिंग आणि वित्तीय सेवा यांच्याशी संबंधित इंग्रजी संज्ञांचे अर्थ मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी या शब्दकोशाची रचना केली आहे. आज शहरी तसेच ग्रामीण भागांत अनेकविध बँका, सहकारी पतसंस्था, वित्तसंस्था तसेच इतर गुंतवणूकयोजनांचे विस्तीर्ण जाळे निर्माण झाले आहे. अशा सर्वच संस्था आणि व्यक्तींना या शब्दकोशाच्या माध्यमातून या संदर्भात इंग्रजी शब्द व संज्ञांचे नेमके अर्थ सुलभ मराठीतून मिळतील, अशी खात्री आहे.
सुयोग्य व्याख्या नि स्पष्टीकरणासह मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ .
सुमारे २००० हून अधिक संज्ञा तसेच शब्दसमूहांचा समावेश.
संदर्भमूल्य असलेला शब्दसंग्रह.
पारिभाषिक शब्दांची मराठीच्या धाटणीनुसार घडण.
बँक व्यवसायाचा इतिहास आणि वित्तीय सेवा यांच्याबद्दलची नेमकी माहिती
देणार्या दोन विशेष परिशिष्टांचा समावेश.
मराठी माध्यमाच्या तसेच बँकिंग सेवांच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या
अभ्यासकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त.