भगिनी निवेदिता
यांचे आयुष्य अत्यंत प्रेरणादायी होते.
त्यांच्या चरित्रातील महत्त्वाचा कालखंड
स्वातंत्र्यसंग्रामाने व्यापलेला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे कार्य अतुलनीय आहे. या कार्याचा परिचय करण्याचा हा एक लहानसा प्रयत्न. त्यांच्या सामाजिक जाणिवांबरोबर राष्ट्रभावनादेखील अत्यंत प्रखर होती. ही परदेशी महिला भारताची सुकन्या झाली आणि तिने देशाप्रती असलेले आपले कर्तव्य चोख बजावले. त्यांच्या कार्याची कल्पना त्यांच्या भाषणांमधून आणि लिखाणांमधून येते. त्यांच्या आजवरच्या लिखाणाचे केलेले परिशीलन आणि विचारमंथन यांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे.
त्यांनी आपले सारे जीवन देशाच्या विकासासाठी
आणि स्वातंत्र्यासाठी झगडण्यात वेचले. अनेक वेळा संकटांना सामोरे जाऊन देशबांधवांच्या खांद्याला खांदा लावून त्या स्वातंत्र्यासाठी लढल्या. त्यांच्या या संघर्षमय जीवनाला
शतशः प्रणाम....!