‘भारत आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांमधील संबंध’ या ग्रंथामध्ये भारताचे त्याच्या शेजारील राष्ट्रांबरोबरचे संबंध याची राजकीय व भूसामरिक दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा केली आहे. दक्षिण आशियातील प्रादेशिकता, भारताचा विस्तार भौगोलिक स्थिती, भूसामरिक स्थान व त्याचे महत्त्व, भारतीय सीमांचा अभ्यास, भारतीय राष्ट्रीय शक्ती, युद्धे, हिंदी महासागर व त्याचे सामरिक महत्त्व, दक्षिण आशियातील शस्त्र व अण्वस्त्रस्पर्धा, दक्षिण आशियात अमेरिका, रशिया व चीन या बाह्य शक्तींचा होत असलेला हस्तक्षेप, दक्षिण आशियाच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांपुढील आव्हाने, सार्कमधील भारताची भूमिका, यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा या ग्रंथात अंतर्भाव केला आहे. त्यातील या सर्व मुद्यांचा राज्यशास्त्र, समाजशास्त्र व संरक्षण आणि सामरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार्या पदवी व पदव्युत्तर पातळीवरील आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांनाही हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.