भारताच्या संस्कृतिवैभवाच्या खुणा प्राचीन शिलालेख- ताम्रपट, यांमध्ये विखुरलेल्या आहेत. प्राचीन नाणी, लेणी, गुंफा इत्यादींच्या अभ्यासाने सम्राट अशोक, सातवाहन राजकुल, शिलाहार राजे यांच्याबद्दल नवीन माहिती मिळते इतकेच नव्हे तर तत्कालीन शहरांची आणि जनजीवनाचीही कल्पना स्पष्ट होते. कान्हेरीस नव्याने सापडलेल्या शिलालेखांवरून कान्हेरी हे एक बौद्ध शैक्षणिक केंद्र होते हे सिद्ध झाले. पुरातत्त्वाचे अभ्यासक, संशोधक आणि जनसामान्य अशा बहुविध रुचीच्या वाचकांना आवडेल असा भुरळ पाडणारा आशय अत्यंत आकर्षक शैलीत या पुस्तकात मांडला आहे.